Nashik Crime News : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे ७० वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराजवळील तळ्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मंदाकिनी हरिभाऊ सोनवणे (वय ७०, रा. लखमापूर, ता. दिंडोरी) यांचा मृतदेह ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घराजवळील तळ्यात आढळून आला. (Dindori Crime News)
Nashik : नाशिक शहरातील ठक्कर बाजार बसस्थानकात रविवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी कुटुंबासोबत निघालेल्या १७ ...
घराशेजारील तळ्यात आढळला मृतदेह
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेच्या तोंडावर कापड बांधले. त्यानंतर तिचे हात-पाय बांधून तिला घराजवळील तळ्यात टाकल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली. (Dindori Crime News)
उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव शेलके तसेच सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला? या घटनेमागे कोणाचा हात आहे? तसेच अज्ञात आरोपीने हा प्रकार का केला? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. (Dindori Crime News)
Pune : पुण्यातील बिबवेवाडी याठिकाणी एक धक्कादायक सायबर गुन्हेगारीचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडीतील ५६ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर एक मेसेज आला... ‘गॅस ...
महिला घरात एकट्याच राहत होत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मंदाकिनी सोनवणे या घरात एकट्याच वास्तव्यास होत्या. त्यामुळे त्यांच्या हत्येमागील कारण आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. या घटनेमुळे लखमापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात मारेकऱ्याचा लवकरात लवकर शोध घेऊन या हत्येचा उलगडा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.