Monday, September 7, 2026

Kanjurmarg Dumping Ground : कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा आणि दुर्गंधीवर ‘निरी’च्या उपाययोजना

Kanjurmarg Dumping Ground : कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा आणि दुर्गंधीवर ‘निरी’च्या उपाययोजना

सभोवतालच्या नागरी वस्तीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करणार

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचा कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंड अर्थातकांजूर नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे मिथेन वायु उत्सर्जनाची होणारी तपासणी तसेच सभोवतालच्या नागरी वस्तीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करुन आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (निरी) नियुक्ती करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत मुंबईत निर्माण होणा-या नागरी घन कच-यापैकी सुमारे ९० टक्के नागरी घनकच-यावर कांजूर येथील प्रकल्पाद्वारे शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्यात येते. कांजूर येथे दररोज सुमारे ६३०० मेट्रीक टन नागरी घन कचरा या प्रकल्पांतर्गत टाकण्यात येतो. त्यापैकी सुमारे १००० मेट्रीक टन नागरी घन कच-यावर विंड्रोज खतनिर्मिती तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्यात येत आहे. उर्वरीत ५३०० मे. टन नागरी घनकचरा कचरासाठी उपयोग केला जात आहे. येथील सर्व कचऱ्यांवर शास्त्रोक्त पध्दतीने बायोरिएक्टर तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्यात येते.

वनशक्ती आणि इतर यांनी महानगरपालिकेच्या कांजुर येथील नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका क्र. ६३/२०१९ दाखल केली आहे. या परिसरातील इतर नागरिक व संस्था यांनीही या संदर्भात मुंबई उच्चन्यायालयात रिट याचिका, जनहित याचिका इ. दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने या सर्वरिट याचिका, जनहित याचिका एकत्रित केल्या आहेत.

लॉस एंजेलिसमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया संस्थेने एप्रिल, २०२६ मध्ये दैनंदिन वृत्तपत्रात मिथेन उत्सर्जनाबाबत जागतिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात कांजूर नागरी घन कचरा प्रकल्प मिथेन उर्त्सजित करणा-या यादीत जागतिक पातळीवर १२ व्या क्रमांकावर आहे. मिथेन उत्सर्जनामुळे मोठया प्रमाणात उष्णता साठून राहते व या उष्णतेमुळे वातावरणीय घटनांची तिव्रता वाढली आहे, तसेच आजारांचाही सामना करावा लागत आहे असे दैनंदिन वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहे. सट बाबतीत मान. उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.

महापालिकेच्या कांजूर नागरी घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील मिथेन उत्सर्जनाबाबत करून योग्यती कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले. या बाबतीत तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील असे प्रतिज्ञा पत्राद्वारे महापालिकेतर्फे मान. उच्च न्यायालय, मुंबई यांना सादर करण्यात आले आहे.

या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कांजूर नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील मिथेन उत्सर्जनाबाबत अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना राबविण्याकरीता तसेच कांजूर नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील परिसराच्या आत आणि बाहेरील दुर्गंधीच्या विविध स्रोतांची, त्यांच्या स्वरूपासह व तीव्रतेसह तपासणी करणे, उष्णता संवेदक, थर्मल इमेजिंग, ड्रोन सर्वेक्षण मॅपिंग करुन त्यानुसार योग्य उपाययोजनांची शिफारस करणे आदी कामासाठी नीरी या संस्थेची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.

निरी कशाप्रकारे सुचवणार उपाययोजना

त्याअनुषंगाने मिथेन उर्त्सजनाबाबत मुंबई महानगरपालिकेमार्फत निरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. दोन वर्षांच्या अभ्यासादरम्यान, मे. निरी तर्फे उपग्रह छायाचित्रण तसेच प्रत्यक्ष कार्यस्थळी मॉनिटर्स लावून व ड्रोनच्या सहाय्याने सुध्दा मिथेन उर्सजनाचा अभ्यासकरून त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणार आहे. तसेच कांजूर नागरी घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प येथील परिसराच्या आत आणि बाहेरील दुर्गंधीच्या विविध स्रोतांची, त्यांच्या स्वरूपासह व तीव्रतेसह तपासणी करुन त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा