वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेतील ‘न्यू मेक्सिको’ या राज्याचे नाव बदलून ‘न्यू अमेरिका’ करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘टूथ’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते ‘मेक्सिको’ हा शब्द खोडून त्याऐवजी ‘अमेरिका’ असे लिहिताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “अनेक लोकांनी न्यू मेक्सिकोचे नाव बदलून ‘न्यू अमेरिका’ करण्याची सूचना केली आहे. या शानदार राज्यातील नागरिकांसाठी हे नाव अधिक सन्मानजनक आणि सुंदर ठरेल. व्वा, मला हे खूप आवडले!” यापूर्वी, इराणसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझचे नाव बदलण्याचीही चर्चा केली होती.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एका पोस्टद्वारे म्हटले होते की, जर होर्मुझ आता अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असेल, तर त्याचे नाव ‘ट्रम्प स्ट्रेट’ का ठेवू नये? ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले होते, “आता होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेच्या नियंत्रणात आहे, तर तिचे नाव बदलून ‘ट्रम्प स्ट्रेट’ का ठेवू नये?” पुढे त्यांनी म्हटले की, अमेरिकेप्रमाणेच ही सामुद्रधुनीही पूर्वीपेक्षा अधिक ‘हॉट’ असेल.
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात एक नवी आणि मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च ...
यापूर्वी ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा शेअर करत त्याला “न्यू यु.एस टेरिटरी” असे संबोधले होते. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी आणि अरबी समुद्राशी जोडते. जगातील तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याचा मोठा हिस्सा याच सागरी मार्गातून वाहतूक केला जातो.
New Mexico’s name isn’t up for debate — it’s been ours since before the United States existed. What is up for debate? Who’s showing up for working families.
While the President tries to distract Americans from his disastrous war in Iran, gas prices keep soaring. Americans are… pic.twitter.com/tnX1gPItDH
— Governor Michelle Lujan Grisham (@GovMLG) September 6, 2026
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन भागात (Satya Niketan Building Collaps) ५ मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी मेक्सिकोच्या आखाताचे आणि ओंटारियो सरोवराचे नाव बदलण्याच्या दिशेनेही पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडासोबत सुरू असलेल्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ओंटारियो सरोवराचे नाव बदलून ‘लेक अमेरिका’ करण्याचा आदेश दिला होता. अमेरिकेच्या सीमांबाहेरपर्यंत विस्तारलेल्या एखाद्या जलक्षेत्राचे नाव बदलण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या आखाताचे नाव बदलून ‘अमेरिकेचा आखात’ करण्याचा आदेश दिला होता. यानंतर ॲपल आणि गुगलनेही अमेरिकेतील त्यांच्या नकाशांवर या जलक्षेत्राचे नाव बदलले. मात्र, मेक्सिको आणि कॅनडा या दोन्ही देशांनी या नावांमध्ये करण्यात आलेले बदल मान्य केलेले नाहीत.