Nora Fatehi Defamation Case : नोरा फतेही अडचणीत! ‘लेगो विमान’ म्हणणं पडलं महागात; थेट ३ कोटींचा मानहानीचा दावा

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही सध्या कायदेशीर वादात अडकली आहे. एका विमान वाहतूक कंपनीने तिच्याविरोधात गांधीनगर न्यायालयात तब्बल ३ कोटी रुपयांचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला आहे. चार्टर्ड विमानाबाबत नोराने सोशल मीडियावर केलेल्या कथित वक्तव्यांमुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला आणि व्यवसायाला धक्का बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Nora Fatehi Defamation Case)


गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नोराने मुंबई ते जयपूर असा चार्टर्ड विमानाने प्रवास केला होता. यावेळी तिने विमानातील काही व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. या पोस्टमध्ये विमानाचे वर्णन करताना तिने कथितरित्या ‘लघु प्रतिकृती’, ‘खेळणे’ आणि ‘लेगो विमान’ अशा शब्दांचा वापर केला होता. या टिप्पण्यांवर ड्युन्स एव्हिएशनने आक्षेप घेतला असून, त्या अपमानास्पद आणि बेजबाबदार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (Nora Fatehi Defamation Case)


कंपनीच्या म्हणण्यानुसार, नोराच्या सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्याने विमान कंपनीच्या व्यावसायिक प्रतिमेला धक्का बसला. तसेच या वक्तव्यांचा व्यवसायावरही परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे झालेल्या कथित नुकसानीची भरपाई म्हणून कंपनीने नोराकडून ३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. या प्रकरणामुळे आता नोरा फतेहीसमोरील कायदेशीर अडचणी वाढल्या असून, न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे. (Nora Fatehi Defamation Case)



मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुनावणी २५ सप्टेंबर रोजी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर. अग्रवाल यांच्यासमोर होणार आहे. दाव्यानुसार, अभिनेत्रीची टिप्पणी तिच्या मोठ्या सोशल मीडिया फॉलोअर्समुळे मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचली, जे फॉलोअर्स कंपनीच्या मते ४.६ कोटींहून अधिक आहेत. ड्युन्स एव्हिएशनने दावा केला आहे की, या वक्तव्यांमुळे बुकिंग रद्द झाली आणि त्यांच्या व्यावसायिक कामकाजावर नकारात्मक परिणाम झाला.


मिळालेल्या वृत्तानुसार, कंपनीने नोराची विधाने "बेपर्वा, बेजबाबदार आणि कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय, पडताळणीशिवाय किंवा तथ्यात्मक आधाराशिवाय केलेली" असल्याचे म्हटले आहे. तसेच, या टिप्पण्यांमुळे "प्रतिष्ठेचे गंभीर नुकसान, सद्भावना हानी आणि प्रतिकूल व्यावसायिक परिणाम" झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे. ड्यून्स एव्हिएशनने असा आरोप केला आहे की, या वादानंतर त्यांच्या बुकिंगमध्ये १५-२० टक्क्यांनी घट झाली, तर रद्द होणाऱ्या बुकिंगमध्ये वाढ झाली.(Nora Fatehi Defamation Case)



विमानाचा बचाव करताना, ड्यून्स एव्हिएशनने सांगितले की प्रवासासाठी वापरलेले सेसना सिटेशन सीजे२ हे एक मानक विमान होते आणि उड्डाणासाठी योग्य आकाराचे होते. त्यांनी असेही सांगितले की, हे विमान पूर्णपणे डीजीसीए-प्रमाणित आणि उड्डाणयोग्य असून, एका वैध नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर्स परमिट (NSOP) अंतर्गत कायदेशीररित्या चालवले जात होते. (Nora Fatehi Defamation Case)


विमान वाहतूक कंपनीने नोराकडे ३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने न्यायालयाला अशी विनंती केली आहे की, त्या अभिनेत्रीला विमानासंदर्भात कथित टिप्पणी किंवा उल्लेख असलेल्या सोशल मीडिया पोस्ट आणि इतर ऑनलाइन मजकूर काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत. कंपनीने त्या वक्तव्यांसंदर्भात नोराकडून सार्वजनिक स्पष्टीकरणही मागितले आहे. (Nora Fatehi Defamation Case)


Comments
Add Comment

Akshay Kumar: टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारला धसका? अभिनेत्याने उचलले मोठे पाऊल

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या कारवर 18 ऑक्टोबरला जुहू येथे तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. टायगर

पुन्हा एकदा त्याच थिएटरमध्ये राज- सिमरनच्या DDLJ ने इतिहास रचला, नेमका विक्रम काय केला?

मुंबई: 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील खूप मोलाचा मानला जाणारा लोकप्रिय

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ची जगभरात धूम ! दृश्यम 3’ला टाकले मागे, 7 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई

Jailer 2 Worldwide Box Office Collection : सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे.

Rashmika Mandana: बोल्ड सीन्स आणि अंग प्रदर्शनाबद्दल रश्मिका मंदाना जरा स्पष्टच बोलली; म्हणाली, "लाज वाटते पण..."

[caption id="attachment_1068419" align="aligncenter" width="800"] टॉलिवूड कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अलीकडेच 'कॉफी विथ करण'च्या 9 व्या

'Janak' Marathi Movie: सायली संजीवच्या नव्या भूमिकेची चर्चा! ‘जनक’मधून उलगडणार बाप-लेकीच्या नात्याची कहाणी

ज्या बापाने लेकीसाठी आयुष्यभर आभाळाएवढं प्रेम दिलं, त्याच बापावर जेव्हा आरोपांचं सावट येतं, तेव्हा त्याच्या

Bigg Boss Season 20: या विकेंडला रोहित शेट्टी घेणार सदस्यांची शाळा; सलमान खान का राहणार गैरहजर?

बिग बॉस सीजन २० च्या मंचावर शोचा होस्ट सलमान खानने एक मोठी घोषणा केली आहे. या विकेंडला शोचा होस्ट बदलणार असल्याचं