Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरांचा लोणावळ्यात ₹70 कोटींचा ‘मास्टरस्ट्रोक’! 3.86 एकर जमीन खरेदी; नेमका काय आहे प्लॅन?

पुणे : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने विक्रमांचे डोंगर उभारणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आता रिअल इस्टेटमध्ये तब्बल ₹70 कोटींची मोठी गुंतवणूक केली आहे. तेंडुलकर यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या लोणावळ्यात सुमारे 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. मालमत्ता नोंदणीशी संबंधित कागदपत्रांनुसार हा व्यवहार ४ सप्टेंबर २०२६ रोजी तीन स्वतंत्र कन्व्हेयन्स डीडद्वारे नोंदवण्यात आला.(Sachin Tendulkar Lonavala property)



या व्यवहारांची एकत्रित किंमत सुमारे ₹69.99 कोटी आहे. एकूण जमीन सुमारे 15,601.78 चौरस मीटर, म्हणजेच जवळपास 1.68 लाख चौरस फूट किंवा 3.86 एकर इतकी आहे. ही मालमत्ता लोणावळ्याच्या मावळ तालुक्यातील एच वॉर्डमधील चार सिटी सर्व्हे क्रमांकांमध्ये पसरलेली आहे.(Sachin Tendulkar 70 crore)


या तीन व्यवहारांपैकी सर्वात मोठा व्यवहार तब्बल ₹63.69 कोटींचा आहे. त्यामध्ये सुमारे 3.09 एकर जमीन असून तेंडुलकर यांनी या भूखंडाची 100 टक्के मालकी घेतली आहे. या जमिनीवर सुमारे 2,100 चौरस फुटांचे विद्यमान बांधकाम असल्याचेही नोंदणी कागदपत्रांतून समोर आले आहे.


उर्वरित दोन व्यवहार अनुक्रमे ₹4.56 कोटी आणि ₹1.75 कोटींचे आहेत. या दोन्ही मालमत्तांमध्ये तेंडुलकर यांनी 50 टक्के अविभाजित हिस्सा खरेदी केला आहे. या दोन व्यवहारांमधील संबंधित क्षेत्रफळ अनुक्रमे 2,302.27 आणि 803.93 चौरस मीटर असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे.(Sachin Tendulkar 3.86 acre)


या संपूर्ण व्यवहारासाठी तेंडुलकर यांनी सुमारे ₹4.20 कोटी स्टॅम्प ड्युटी भरली असून, नोंदणी शुल्क सुमारे ₹90 हजार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तेंडुलकर यांनी ही मालमत्ता नंदन धनंजय मेहता आणि विवस्वत धनंजय मेहता यांच्याकडून खरेदी केल्याचे नोंदणी कागदपत्रांवरून समोर आले आहे.


लोणावळा हे मुंबई आणि पुण्याच्या जवळचे लोकप्रिय सेकंड-होम डेस्टिनेशन असल्याने सेलिब्रिटी आणि उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. मात्र तेंडुलकर या जमिनीवर नेमका कोणता प्रकल्प किंवा वापर करणार आहेत, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या प्रतिनिधींना याबाबत विचारणा करण्यात आली होती, मात्र अहवाल प्रकाशित होईपर्यंत उत्तर मिळाले नव्हते.



मग सचिन तेंडुलकरांनी लोणावळ्यात एवढी मोठी जमीन नेमकी कशासाठी घेतली?


सध्या याचे उत्तर स्पष्ट झालेले नाही. मात्र ₹70 कोटींच्या या मोठ्या व्यवहारामुळे तेंडुलकरांची लोणावळ्यातील रिअल इस्टेट गुंतवणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

Comments
Add Comment

Duleep Trophy Final 2026 : त्रिशतकापासून ३० धावा दूर! इशान किशनचा धडाका; ईस्ट झोनने उभारला ७०८ धावांचा डोंगर

चेन्नई : दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनच्या फलंदाजांनी साऊथ झोनच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत

China Masters : भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विक-चिरागला चायना मास्टर्सचे विजेतेपद

शेन्झेन(चीन) : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. शेन्झेन

Junior Asia Cup Hockey : ज्युनियर महिला हॉकी आशिया कपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय

मोकी : भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने दुसऱ्या एलिट पूल सामन्यात मलेशियाला ११-१ ने पराभूत करत एएचएफ

Shafali Verma : शफाली वर्मा ठरली ३,००० धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू

दुबई : भारताची स्टार सलामीवीर फलंदाज शफाली वर्माने इतिहास रचला. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,०००

IND vs PAK Cricket Match : शेफालीचा सिक्स फातिमाच्या जिव्हारी! विकेट घेताच पाकिस्तानी कॅप्टनने केलं आक्रमक सेलिब्रेशन, टीव्ही अँकर विवेक राजदान म्हणाले...

वुमेन्स आशिया कप २०२६ मधील ९ व्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. रोमांचक लढत

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! इंग्लंड दौऱ्यावर पीसीबीने जप्त केले खेळाडूंचे मोबाईल फोन; मॅच फिक्सिंगचा संशय?

Pakistan Team Crisis: पाकिस्तान क्रिकेट बोर्डा