पंढरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडोरच्या (Pandharpur Corridor) कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. नुकताच या प्रोजेक्टचा ॲनिमेटेड फर्स्ट लूक समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर कॉरिडोरची भाविकांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या ड्रीम प्रोजेक्टला मुख्यमंत्र्याकडून मंजुरी मिळाली असून येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूरातील अनेक विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. या ड्रीम प्रोजेक्टच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (Pandharpur News)
- जागतिक 'ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६' चे करणार उद्घाटन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत असून, ...
या कॉरिडोरच्या कामासाठी सरकारकडून पुढच्या १५ दिवसांमध्ये भूसंपादनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. ४५० निवासी आणि ४०० व्यावसायिक मालमत्ताच्या माध्यमातून ६ एकर जमिनीच्या भूसंपादनाचे काम करण्यात येणार आहे. या जागेवर वारकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या सुविधा करून देण्यात येणार असल्याची माहिती उप जिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडोरचा अखेर आज फर्स्ट लूक समोर आला आहे. या प्रोजेक्टचा ॲनिमेटेड व्हिडिओ समोर आला आहे. (Maharashtra News)
Dhule Crime : धुळ्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. शहरातील जिनगर गल्ली परिसरात शासकीय कर्तव्य ...
येत्या १५ दिवसांमध्ये भूसंपादनाच्या कामाला आणि पुनर्वसनाच्या कामालाही वेग येणार आहे. येत्या काही वर्षांमध्ये संपूर्ण पंढरपूर नगरी कशी दिसणार? याची झलक आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. काशी विश्वनाथ आणि उज्जैनच्या धर्तीवर पुढच्या तीन वर्षांमध्ये पंढरपूर कॉरिडोर साकारले जाणार आहे. दरम्यान,
">विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्या लाखो वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा, सुरक्षा मिळावी, जागतिक पर्यटन वाढावे, पंढरपूरचा आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने कॉरिडॉर राबवण्यात येणार आहे.