Popular Singer Death : कॉन्सर्टच्या काही तास आधी लोकप्रिय गायकाचा मृत्यू; तीव्र ताप आल्यानं दुबईत घेतला अखेरचा श्वास  

संगीत विश्वातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलीवूडचे दिग्गज पार्श्वगायक उदित नारायण यांच्यासारख्या हुबेहूब आवाजासाठी प्रसिद्ध असलेला लोकप्रिय गायक निसार वायनाड याचे दुबईत निधन झाले. वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे, अजमान येथे एका संगीत कार्यक्रमात सादरीकरण करण्याच्या काही तासांआधीच त्याच्यासोबत ही प्राणघातक घटना घडली.



मूळचा केरळमधील वायनाड येथील असलेला निसार अरोथ इब्राहिम (निसार वायनाड) हा त्याच्या बहारदार स्टेज शो आणि विशेषतः माप्पिल्लापाट्टू गाण्यांच्या सादरीकरणासाठी गल्फ देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. ऑगस्ट महिन्यात तो विविध संगीत कार्यक्रमांसाठी दुबईत गेला होता. शनिवारी दुपारी त्याला अचानक तीव्र ताप आल्यामुळे तातडीने येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अवघ्या काही वेळातच त्याची प्रकृती खालावली आणि त्याने तिथेच प्राण सोडले.(Popular Singer Death)



वैद्यकीय अहवालांनुसार, त्याच्या मृत्यूचे मुख्य कारण 'ॲसिडोसिस' (Acidosis) आणि 'सेप्टिसेमिया' (Septicemia) असल्याचे समोर आले आहे. शरीरात तीव्र संसर्ग (इन्फेक्शन) पसरल्यामुळे त्याचे महत्त्वाचे अवयव निकामी झाले आणि रक्तातील आम्ल प्रमाण वाढल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.



उदित नारायण यांच्या आवाजाशी कमालीचे साम्य असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत बहरीनच्या मंचावर गाण्याची संधी मिळाल्यामुळे तो संगीत वर्तुळात चर्चेत आला होता. त्याच्या अचानक निधनामुळे दुबईतील संगीतप्रेमी आणि चाहत्यांना तीव्र धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून, त्याच्या पार्थिवावर केरळमधील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. एका होतकरू गायकाचा अशा प्रकारे अचानक अंत झाल्याने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.(Popular Singer Death)

Comments
Add Comment

Devghar On Rent Marathi Movie : 'गौतमी पाटील'ची मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री! ‘देवघर ऑन रेंट’मधून अभिनयाच्या नव्या इनिंगला सुरुवात; अंगावर शहारे आणणाऱ्या टीझरची सर्वत्र चर्चा

मुंबई : पुढील काही महिन्यांत अनेक बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘देवघर

Mary Kom Bigg Boss 20 Entry : मेरी कोम उतरली ‘बिग बॉस २०’च्या आखाड्यात; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम आता सलमान

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा करिअरमधून ब्रेक ! आता स्टार्टअपसाठी चाहत्यांकडे मागितल्या भन्नाट आयडिया

Abhinay Berde : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डे सध्या एका वेगळ्याच

Mahatma Gandhi Biopic : गांधीजींच्या भूमिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करणारा हा अभिनेता आहे तरी कोण...? फर्स्ट लूक भलताच चर्चेत!

मुंबई : असंख्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा आहेत, ज्या पडद्यावर साकारण्याचं स्वप्न अनेक कलाकार पाहतात. छत्रपती

Poonam Pandey : पूनम पांडे म्हणतेय, ‘वेश्याव्यवसाय कायदेशीर करा’! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पूनम

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या दोन दिवसांत ६० कोटींचा टप्पा पार

मुंबई : लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘मिर्झापूर: द