Eco Friendly Ganesh Festival : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन; मंत्रालयात ८ सप्टेंबरला ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सव’

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सव-२०२६’ तसेच खादी वस्त्रे व ‘मधुबन’ मध विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. (Eco Friendly Ganesh Festival)

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण आणि सूक्ष्म उद्योजकांना उद्योगाभिमुख मार्गदर्शन, प्रोत्साहन तसेच विपणन सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. मंडळाच्या नियंत्रणाखाली पुणे येथे कार्यरत असलेली हातकागद संस्था ही जुनी व ऐतिहासिक संस्था असून, संस्थेमार्फत विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते. (Eco Friendly Ganesh Festival)




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील हातकागद संस्थेमार्फत पांढऱ्या चिंध्यांपासून तयार केलेल्या हातकागदाच्या लगद्याचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात येतात. तसेच पर्यावरणपूरक आकाशकंदीलही तयार केले जातात. या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. (Eco Friendly Ganesh Festival)

पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. महोत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची रंगरंगोटी करण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, त्यासोबतच खादी वस्त्रे आणि ‘मधुबन’ मधाची विक्री व प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. (Eco Friendly Ganesh Festival)




या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पुढे न्यावा आणि पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात आपला हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी केले आहे. (Eco Friendly Ganesh Festival)



Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : महाप्रसाद आणि भंडाऱ्याबाबत 'एफडीए'च्या आयत्यावेळच्या नियमावलीमुळे गणेशोत्सव मंडळे नाराज

- 'एसओपी' निश्चितीसाठी आज बैठक; मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीच्या अध्यक्षांचा बहिष्कार मुंबई : लाडक्या बाप्पाच्या

Dattatray Bharne : भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

पुण्यात 'आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद-२०२६' चा दिमाखदार शुभारंभ पुणे : भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च

Caste Validity Certificate : जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या

Nitin Gadkari : "नागपुरातील ९९% अंडरवर्ल्ड माझे समर्थक, पण..." केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खळबळजनक विधान

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पल्या रोखठोक आणि थेट वक्तव्यांसाठी ओळखले

Pinky Tigress : ‘पिंकी’ची दहशत संपली! ४ बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद

अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक

Pandharpur News: पंढरीचा कायापालट होणार, पंढरपूर कॉरिडोरचा फर्स्ट लूक समोर

पंढरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडोरच्या (Pandharpur Corridor)