एआय आणि न्यूरोसायन्सच्या सहाय्याने या आजारांचे अचूक निदान आणि विश्लेषण करण्यासाठी प्रयोगिक तत्वावर राबवणार प्रकल्प
मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महानगरपालिकेच्या स्माईल कॉन्सिल या बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या "कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व न्यूरोसायन्सच्या साहाय्याने मेंदूविषयक आजारांचे अचूक निदान व विश्लेषण करणारा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर महापालिका रुग्णालयात राबवण्यात येणार आहे. अचूक निदान व विश्लेषण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प व उपकरण विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे महानगरपालिकेतील रुग्णालयात येणाऱ्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत काय बदल होतात हे नियमितपणे पाहताही येणार आहे. (KEM Hospital)
सभोवतालच्या नागरी वस्तीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करणार मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचा कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंड अर्थातकांजूर नागरी ...
"व्यवसाय विकास विभाग अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या "सोसायटीफॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल" या बिझनेस इनक्युवेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. स्माईल कॉन्सिल बिझनेस इनक्यूबेशन सेंन्टरमध्ये ब्रेनसाइटएआय टेक्नॉलॉजी प्रा. लि. या इनक्यूबेटीचा समावेश करण्यात आलेला आहे. ब्रेनसाइटएआय टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व न्यूरोसाइन्सच्या साहाय्याने मेंदूविषयक आजारांचे अचूक निदान व विशेषण करण्याच्या उद्देशाने संबंधित प्रकल्प व उपकरण विकसित केले आहे. (KEM Hospital Mumbai)
महानगरपालिकेच्या के. इ. एम रुग्णालयातील, न्यूरोसर्जरी विभागा प्रमुख अधिकारी यांनी ब्रेनसाइटएआय टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता व (एआय) व न्यूरोसायन्सच्या साहाय्याने मेंदविषयक आजारांचे अचूक निदान व विश्लेषण करणारा प्रकल्प के. इ. एम. रुग्णालयामध्ये १५० अपस्मार व मेंदू गाठी (ब्रेन टयुमर) रुग्णांवर १२ महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासाठी या ब्रेनसाइटएआय टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीला या प्रकल्पासाठी एकूण खर्च ४.९९ कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. हा प्रकल्प स्टार्टअपमार्फत तयार केलेला आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर या मशिन्सची खरेदी करण्यात येईल व त्याअंतर्गत हा प्रकल्प सध्या केईएम रुग्णालयात राबवण्यात येणार असल्याचे असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Neurological Diseases)





