Monday, September 7, 2026

Shivsena News: शिवसेनेचे ऑपरेशन 'टायगर-४' लवकरच!

Shivsena News: शिवसेनेचे ऑपरेशन 'टायगर-४' लवकरच!

आमदार मुरजी पटेल यांचा दावा; ‘ग्रीन सिग्नल’ मिळताच मोहीम फत्ते होणार

मुंबई: "उबाठा गटाचे २० पैकी १४ आमदार सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांच्या संपर्कात असून, 'ग्रीन सिग्नल' मिळताच लवकरच 'ऑपरेशन टायगर-४' (Shiv Sena Operation Tiger 4) प्रत्यक्षात येईल आणि हे आमदार शिवसेनेत प्रवेश करतील", असा दावा अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांनी सोमवारी केला.

याविषयी माध्यमांशी बोलताना आमदार पटेल (Murji Patel) म्हणाले की, १४ आमदारांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला की ही मोहीम फत्ते होईल. आगामी काळात आमदारांनंतर उबाठा गटातील काही नगरसेवकही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल होऊ शकतात. दरम्यान, या दाव्यावर बोलताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी, अशा कोणत्याही दाव्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हणत हा निव्वळ राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, उबाठा गटातील काही आमदारांनी अज्ञात ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. या कथित भेटीमुळे

">'ऑपरेशन टायगर-४' च्या दाव्याला आणखी बळ मिळाले आहे. पक्षांतरबंदी नियमांनुसार उबाठा गटाच्या विधानसभेतील एकूण संख्याबळाच्या तुलनेत १४ हा आकडा दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ जाणारा असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. (Uddhav Thackeray Shivsena)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >