Jogeshwari Trauma Hospital : जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात खरेदी केलेली २५ कोटींची मशिन धुळखात

महापौर रितू तावडे यांनी या मशिनचा त्वरीत वापर करण्याचे दिले निर्देश


महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही एकमेव मशिन उपलब्ध तरीही ८ वर्षांपासून बंद


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत साथीच्या आजारांसोबतच महापालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्ण आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र यावेळी जोगेश्वरीतील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात अपघातात निदान करण्यासाठी सहायभूत ठरणारी २५ कोटी रुपये खर्च करून मशिन खरेदी केली आहे. ही मशिन सन २०१८पासून धुळखात पडली असून मुंबईत महापालिकेच्या या एकमेव रुग्णालयात असूनही त्याचा वापर होत नाही. त्यामुळे याचा त्वरीत वापर केला जावा असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी महापालिका सभागृहात देतानाच वैद्यकीय कंत्राटी सेवांमधील कामगार सुयोग्य मोबदला मिळतो की नाही याकडेही लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.



मुंबई महापालिका सभागृहात मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी ६६ ब अन्वये चर्चा घडवून आणताना मुंबईमध्ये पावसाळयात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्लू यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रसार झपाटयाने होतो, या आजारांना रोखण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून व्यापक स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. या


साथीच्या आजारांसाठी विशेष कक्ष तयार करणे, रुग्णांची संख्या वाढली तर रुग्णालयातील इतर विभागातील रिकामी असलेल्या रुग्णक्षय्या तातडीने उपलब्ध करुन त्यांच्यावर उपचार सुरु करणे, अतिदक्षता विभागात डॉक्टर व नर्सेसची संख्या वाढविणे, रुग्णालयात महाग औषधे व इंजेक्शन ह्यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करणे. साथीचे आजार पसरु नयेत, म्हणून रुग्णालयात स्वच्छता ठेवणे. तसेच एखाद्या रुग्णाला वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागणार असतील त्याला रुग्णालयातच विनामुल्य सेवा उपलब्ध करुन दिली पाहिजे अशी मागणी केली. यावर उबाठाचे सचिन पडवळ यांनी धुर फवारणींचे नवीन मशिन्स खरेदी केली जावी,तसेच व्हेहीकल माऊंटेंड धूर फवारणी मशिन्सही खरेदी केल्या जाव्यात. एमआयएमचे जमीर कुरेशी यांनी औषध फवारणी आणि धूर फवारणींमध्ये कशाप्रकारे कमी मात्रा वापरली जाते असे सांगत अशाप्रकारच्या आजारांसाठी हेल्पलाईन सुरु करणार आहोत का खाटा उपलब्ध किती आहेत हे रुग्णांना माहिती मिळावी याकरता असे सांगितले. तर उबाठाचे यशाेधर फणसे यांनी यावर केलेल्या उपाययोजनांची सर्व माहिती द्वावी, तर संध्या दोषी यांनी धूर फवारणी करून यावर नियंत्रण येणार का असा सवाल करत आर दक्षिण विभागात किती धूर फवारणी मशिन्स आहे त्यांची माहिती देण्यात यावी अशी सूचना केली. तर एमआयएमचे विजय उबाळे यांनी बांधकाम ठिकाणांची पाहणी करून त्यांना नोटीस देवून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी सूचना केली.


विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी कस्तुरबा रुग्णालयात या साथीच्या आजारांच्या रुगणंवर उपचार केले जातात. पण या रुग्णालयांमध्ये मशिन्स आणि मनुष्यबळाची किती कमतरता आहे याची जंत्री वाचून दाखवली. तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांची माहिती दिली.


यावर महापौर रितू तावडे यांनी महापालिकेच्या जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात अपघात ग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डिएस मशिन्सची खरेदी केली आहे. ही मशिन्स मुंबईत केवळ रिलायन्स रुग्णालय आणि महापालिकेच्या या एकमेव रुग्णालयात आहे. परंतु सन २०१८ पासून ही मशिन धुळखात पडलेली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेली मशिन बंद पडून आहे. ही मशिन त्वरीत सुरु करावी. तसेच कंत्राटी पध्दत बंद करा. कंत्राटी कामगारांना२१ हजार पूर्ण पगार द्यावा. त्यांच्या पगारात काटछाट करू नये. तसेच कोविड काळात ज्यांनी सेवा बजावली आहे त्या कंत्राटी कामगारांना महापालिकेत समावून घ्या असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.


यावर अतिरिक्त आयुक्त् विपीन शर्मा महापालिकेच्यावतीने शुन्य डास मोहिम हाती घेण्यात आली आहे. रुग्णालय परिसर डासांची उत्पत्ती होवू नये, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी लाळवी नष्ट करणारा औषधाचा साठा नव्हता. परंतु आता इंडियन ऑईल कंपनीकडून तो उपलब्ध होत आहे. ऑगस्ट महिन्यापासून तो साठा उपलब्ध झाला आहे. तसेच सीएसआर निधीतूनही हे उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे योग्यप्रकारे साथीच्या आजारांसह इतर रुग्णांवर उपचार यंत्रणा राबवली जात आहे. तसेच महापौरांच्या निर्देशानुसार संबंधित विभागाला याबाबत अवगत केले जाईल असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane on Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणाशी संबंध नसेल तर आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका का दाखल केली ? मंत्री नितेश राणे यांचा सवाल

तत्कालीन महापौरांनी दिशाच्या आईवडिलांना धमक्या दिल्या मुंबई : दिशा सालियन (Disha Saliyan) मृत्यू प्रकरणाशी जर आदित्य

Nitesh Rane : गरब्यात मुस्लिमांना ‘नो-एन्ट्री’ - मंत्री नितेश राणे यांची भूमिका

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य असावे मुंबई : नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया

Maratha Reservation News : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री खलबते

- महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती; मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत झाली चर्चा मुंबई : मराठा आंदोलक मनोज

Garib Nagar : गरीब नगरमधील 100 झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचे घर; सप्टेंबरअखेर पुनर्वसन पूर्ण करण्याचे MMRDAचे नियोजन

मुंबई :  गरीब नगरमधील पात्र कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वांद्रे पूर्व येथील गरीब नगर

College Admission : ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई; इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे निर्देश

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच

Dadaji Bhuse : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

भौतिक सुविधा आणि संस्कारांवरही भर मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य