Mumbai Local Train Update : टिटवाळ्यात १५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक; लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम

मुंबई : १५ डब्यांच्या लोकल गाड्या सामावून घेण्यासाठी टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचे काम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी २८/२९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ११/१२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दररोज ५ ते ६ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यानुसार ९/१० सप्टेंबरच्या मध्यरात्री २३.३० ते पहाटे ५.१० वाजेपर्यंत अप आणि डाउन नॉर्थ-ईस्ट मार्गावर ब्लॉक राहणार आहे. (Mumbai Local Train Update)



टिटवाळा-कसारा मार्गावर लोकल सेवा बंद


ब्लॉकच्या कालावधीत टिटवाळा आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. टिटवाळ्यापर्यंत धावणाऱ्या काही लोकल सेवा आसनगावपर्यंत वाढवण्यात येतील, तर टिटवाळ्याहून सुटणाऱ्या काही सेवा आसनगावहून सुरू केल्या जातील.


ब्लॉकमुळे CSMT-टिटवाळा, CSMT-कसारा, ठाणे-टिटवाळा, कुर्ला-कल्याण, CSMT-आसनगाव यासह काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच टिटवाळा-CSMT, टिटवाळा-परळ, टिटवाळा-ठाणे आणि आसनगाव-ठाणे मार्गावरील काही अप सेवाही रद्द राहणार आहेत. (Mumbai Local Train Update)



काही लोकल ठाणे आणि कल्याणपर्यंतच


ब्लॉकमुळे काही लोकलच्या फेऱ्या त्यांच्या नियमित स्थानकाऐवजी ठाणे किंवा कल्याणपर्यंतच चालवल्या जाणार आहेत. कल्याणहून CSMTकडे जाणाऱ्या १९.२६ आणि २२.०६ वाजताच्या लोकल ठाण्यापर्यंतच धावतील. तसेच डोंबिवलीहून २१.०८ वाजता सुटणारी CSMT लोकलही ठाण्यापर्यंतच चालवली जाईल.


९/१० सप्टेंबरच्या रात्री CSMTहून कसाऱ्याकडे जाणारी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल २२.४७ वाजता, तर कसाऱ्याहून CSMTकडे जाणारी शेवटची लोकल २२.०० वाजता सुटेल. ब्लॉकनंतर CSMTहून कसाऱ्याकडे जाणारी पहिली लोकल पहाटे ४.१९ वाजता सुटणार आहे. (Mumbai Local Train Update)



एसी लोकलच्या फेऱ्यांमध्येही बदल


CSMT-टिटवाळा आणि दादर-टिटवाळा मार्गावरील काही वातानुकूलित लोकल ठाण्यापर्यंतच चालवल्या जातील. तसेच CSMT-टिटवाळा मार्गावरील ०९.२७ आणि १९.४६ वाजताच्या सेवा कल्याणपर्यंतच चालवल्या जाणार आहेत. टिटवाळा-CSMTच्या काही अप सेवा ठाणे किंवा कल्याण येथून सुरू करण्यात येतील. (Mumbai Local Train Update)



मेल-एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम


या ब्लॉकचा परिणाम काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही होणार आहे. गोरखपूर-दादर एक्सप्रेस वासिंद येथे रात्री २.२७ ते सकाळी ५.०० या वेळेत नियंत्रित केली जाईल. तर अयोध्या कॅन्ट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आटगाव येथे पहाटे २.३५ ते ४.५५ या कालावधीत नियंत्रित केली जाणार आहे. (Mumbai Local Train Update)


याशिवाय शालीमार-एलटीटी एक्सप्रेस, हावडा-सीएसएमटी मेल एक्सप्रेस आणि नागपूर-मडगाव एक्सप्रेस या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. उशिराने धावणाऱ्या किंवा नंतर जाहीर होणाऱ्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकातही परिस्थितीनुसार बदल केला जाऊ शकतो.


१५ डब्यांच्या गाड्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच सुरक्षितता आणि देखभालीच्या कामांसाठी हे ब्लॉक घेण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरीही व्यक्त केली आहे.(Mumbai Local Train Update)


Comments
Add Comment

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंच्या नोकरीतील ५% आरक्षणाचे सुधारित धोरण मंजूर; मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत खेळाडूंच्या शासकीय, निमशासकीय तसेच इतर क्षेत्रातील

BRICS Summit 2026 : 'ब्रिक्स' परिषदेत रंगणार मोदी-पुतिन द्विपक्षीय चर्चा; सुखोई 'Su-57' लढाऊ विमानांचा करार अजेंड्यावर!

नवी दिल्ली : नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या १८ व्या 'ब्रिक्स २०२६' (BRICS Summit) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे

Hartalika And Ganesh Chaturthi : ३१ वर्षांनंतर हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! पूजा कधी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवातच अनोख्या योगाने होणार आहे! कारण तब्बल ३१ वर्षांनंतर हरतालिका आणि गणेश

Malegaon : श्रावणसरीला दुरावले पोळ्यावर दुष्काळाचे सावट, यंत्रमाग संकटात ; ‘कसमादेना’च्या अर्थकारणावर परिणाम

Malegaon : यंत्रमाग उद्योग आणि शेती हा कसमादेनाच्या अर्थकारणाचा कणा आहे. पाली, बालोत्रा येथील कापड प्रक्रिया

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव २०२६ : मुंबईतील १० प्रमुख गणपती मंडळे, त्यांची खास थीम आणि यंदाचे मुख्य आकर्षण

मुंबई : मुंबईत १४ सप्टेंबर २०२६ पासून श्री गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2026) अत्यंत उत्साहात सुरुवात होत असून २५ सप्टेंबर

Preity Zinta : ‘बटवारा १९४७’च्या अपयशानंतर अखेर प्रीती झिंटाने सोडलं मौन; म्हणाली 'मी माझ्या कामात १००० टक्के देते, पण...'

मुंबई : बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री प्रीती झिंटा हिने राजकुमार संतोषी दिग्दर्शित