Nitesh Rane : बंदर प्रकल्पांच्या कामांना गती द्या; कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करा - नितेश राणे

मुंबई : राज्यातील बंदरे विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांना वेग देत त्यांचे प्रभावी नियोजन करावे. तसेच सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिल्या. (Nitesh Rane)


मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मंत्री राणे यांनी विभागातील प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Nitesh Rane)



राज्यात बंदरांची निर्मिती व विकासाला मोठा वाव असून, या माध्यमातून रोजगारनिर्मिती तसेच गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे बंदर विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अन्य राज्यांतील उद्योजकांशी अधिकाऱ्यांनी संवाद साधून राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.


बैठकीत मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच रेडिओ क्लब जेट्टीच्या सद्यस्थितीबाबतही चर्चा करून आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच योजना व सेवांच्या शासकीय प्रक्रियेची पुनर्रचना’ (GPR) अंतर्गत विविध योजना व सेवांच्या प्रक्रियेत सुलभीकरण आणि गतिमानता आणण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. (Nitesh Rane)


Comments
Add Comment

BRICS Summit 2026 : 'ब्रिक्स' परिषदेत रंगणार मोदी-पुतिन द्विपक्षीय चर्चा; सुखोई 'Su-57' लढाऊ विमानांचा करार अजेंड्यावर!

नवी दिल्ली : नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या १८ व्या 'ब्रिक्स २०२६' (BRICS Summit) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे

Hartalika And Ganesh Chaturthi : ३१ वर्षांनंतर हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! पूजा कधी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवातच अनोख्या योगाने होणार आहे! कारण तब्बल ३१ वर्षांनंतर हरतालिका आणि गणेश

Malegaon : श्रावणसरीला दुरावले पोळ्यावर दुष्काळाचे सावट, यंत्रमाग संकटात ; ‘कसमादेना’च्या अर्थकारणावर परिणाम

Malegaon : यंत्रमाग उद्योग आणि शेती हा कसमादेनाच्या अर्थकारणाचा कणा आहे. पाली, बालोत्रा येथील कापड प्रक्रिया

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव २०२६ : मुंबईतील १० प्रमुख गणपती मंडळे, त्यांची खास थीम आणि यंदाचे मुख्य आकर्षण

मुंबई : मुंबईत १४ सप्टेंबर २०२६ पासून श्री गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2026) अत्यंत उत्साहात सुरुवात होत असून २५ सप्टेंबर

Preity Zinta : ‘बटवारा १९४७’च्या अपयशानंतर अखेर प्रीती झिंटाने सोडलं मौन; म्हणाली 'मी माझ्या कामात १००० टक्के देते, पण...'

मुंबई : बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री प्रीती झिंटा हिने राजकुमार संतोषी दिग्दर्शित

Dharmavir Fort : धर्मवीर गडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा, आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश

Dharmavir Fort : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक