Amazon Food Safety Raid : ॲमेझॉन आणि इन्स्टामार्टला मोठा दणका! बंगळुरूमध्ये अन्नसुरक्षा विभागाची धाड; १.३८ कोटींचा माल जप्त!

बंगळुरू : बंगळुरू शहरात (Bengluru News) अन्न आणि औषध प्रशासनाने ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स (Online Delivery Platfort) आणि त्यांच्या गोदामांवर (डार्क स्टोअर्स) एक मोठी धाड टाकली आहे. या कारवाईदरम्यान मुदत संपलेले (एक्सपायर झालेले) आणि नियमांनुसार लेबल नसलेले तब्बल १.३८ कोटी रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच कोणतीही परवानगी किंवा परवाना नसताना साठवून ठेवलेली सुमारे ४ लाख रुपयांची औषधेही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत.



आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाईचा बडगा (Online Delivery Platfort) 


कर्नाटकचे आरोग्यमंत्री यू. टी. खादर यांच्या निर्देशानुसार 'अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन' विभागाने ही विशेष मोहीम राबवली. अन्न सुरक्षा कायदा २००६ आणि औषध व प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत ही तपासणी करण्यात आली. ऑनलाईन अॅप्सद्वारे विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि शेल्फ लाईफ या गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या आहेत की नाही, हे अधिकाऱ्यांनी तपासले. तसेच औषधांची विक्री करण्यासाठी लागणारा अधिकृत परवाना या कंपन्यांकडे आहे का, याचीही पडताळणी करण्यात आली.



ॲमेझॉनच्या गोदामांमध्ये नियमांचे उल्लंघन


तपासणीदरम्यान ॲमेझॉनच्या दोन मोठ्या केंद्रांवर कारवाई करण्यात आली. येथे चुकीचे लेबल असलेले १४ लाख रुपयांचे आणि एक्सपायर झालेले १० लाख रुपयांचे अन्नपदार्थ जप्त केले. तसेच परवान्याशिवाय साठवलेली २.४५ लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली. या केंद्रातून १९ लाखांचे चुकीचे लेबल असलेले आणि १३ लाखांचे मुदत संपलेले खाद्यपदार्थ जप्त केले. तसेच १.५७ लाख रुपयांचा विनापरवाना औषधसाठा हस्तगत करण्यात आला.



ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दुकानांवर धाडी



एचबीआर लेआउट येथील 'सप्ता बाजार' या दुकानाबद्दल प्रशासनाला तक्रारी मिळाल्या होत्या. हे दुकान ऑनलाईन कंपन्यांकडून माल खरेदी करून ग्राहकांना मुदत संपलेले अन्न विकत होते. तिथे छापा मारून काजू बिस्किटे, नाचणीचे पीठ, पनीर, चिकन पॅटीज, सुकामेवा आणि अंडी असा १०,००० रुपयांचा खराब माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे लिंगराजपुरम येथील 'लियो ७ एंटरप्रायझेस' या दुकानातून एक्सपायर झालेले पौष्टिक पदार्थ, पेये, चॉकलेट्स, तूप आणि मिठाई असा तब्बल ५६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. गैरप्रकार आढळल्याने हे दुकान प्रशासनाने तात्काळ सील केले आहे.



अस्वच्छतेमुळे इन्स्टामार्टचे केंद्र बंद (Online Delivery Platfort) 


बंगळुरू ग्रामीण भागातील होसकोटे येथील स्विगी 'इन्स्टामार्ट'च्या गोदामावर मारलेल्या छाप्यात ४२ लाख रुपयांचे मुदत संपलेले अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. हे गोदाम अत्यंत अस्वच्छ स्थितीत चालवले जात होते आणि तिथे अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत होते. त्यामुळे प्रशासनाने हे केंद्र तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.



कारवाईचा एकूण ताळेबंद


चुकीचे लेबल असलेले अन्नपदार्थ : ₹३३ लाख


मुदत संपलेले अन्नपदार्थ : ₹१.०५ कोटी


एकूण जप्त अन्नपदार्थ : ₹१.३८ कोटी


विनापरवाना औषधे : ₹४.०२ लाख


इन्स्टामार्टच्या केंद्रात अजूनही तपासणी सुरू असून, तेथील सुमारे १ कोटी रुपयांच्या इतर संशयास्पद मालाची चौकशी केली जात आहे.



पंचतारांकित हॉटेल्सही प्रशासनाच्या रडारवर


ऑनलाईन स्टोअर्सवर कारवाई करण्यापूर्वी अन्न सुरक्षा विभागाने बंगळुरूमधील २६ तीन-स्टार आणि पाच-स्टार हॉटेल्सचीही तपासणी केली होती. तिथे अस्वच्छ साठवणूक, भाज्यांवर आलेली बुरशी, कुजलेले मांसाहारी पदार्थ (चिकन, मटण, मासे) आणि मुदत संपलेले बेकरी पदार्थ आढळल्याने ते जप्त करण्यात आले होते.

Comments
Add Comment

PM Modi : 'नाराज फुफाजींना आता काम मिळालं!' PM Modi यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी; नक्की कुणावर साधला निशाणा ?

वडोदरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमधील वडोदरा येथे आयोजित 'नमो फॉर विकसित भारत' (Namo For Vikasit Bharat) या

BRICS Summit 2026 : 'ब्रिक्स' परिषदेत रंगणार मोदी-पुतिन द्विपक्षीय चर्चा; सुखोई 'Su-57' लढाऊ विमानांचा करार अजेंड्यावर!

नवी दिल्ली : नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या १८ व्या 'ब्रिक्स २०२६' (BRICS Summit) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे

Maharajganj Shocker Video : जमिनीच्या वादातून संतापलेली तरुणी हातात बंदूक घेऊन पोलीस चौकीत शिरली अन् थेट...उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील महाराजगंज (Uttar Pradesh Maharajganj)  जिल्ह्यातील धरमौली गावात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून

PM Narendra Modi : '८ वर्षे, १ किमीचे कामही पूर्ण झाले नाही'; वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यूपीए सरकारवर घणाघात

रेल्वे मालवाहतूक जाळे पूर्ण क्षमतेने सुरू वडोदरा येथील भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा; ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६’चे करणार उद्घाटन

मुंबई : ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

Egypt Air Show : इजिप्तच्या आकाशात भारताचा ‘सारंग’ थरार! ‘डॉल्फिन लीप’सह नव्या कसरतीने जगाचे लक्ष वेधणार

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या शौर्याची आणि स्वदेशी एरोस्पेस क्षमतेची झलक आता इजिप्