Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहन अशा वेगवेगळ्या माध्यमातून नोकरदार आपल्या गावी जात आहेत. अशातच मध्य रेल्वेने खास गणशोत्सवानिमित्त काही गणपती विशेष ट्रेन्सची घोषणा केली आहे. कोकण रेल्वेकडून दोन अनारक्षित मेमू ट्रेनची घोषणा करण्यात आली असून या ट्रेन्सच्या वेळापत्रक, फेऱ्या आणि त्यांच्या थांब्याबद्दल जाणून घेऊया... (Ganeshotsav 2026)



गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून दोन विशेष अनारक्षित रेल्वे सेवा चालवल्या जाणार आहेत. कोकणात गावी जाताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस आणि चिपळूण- पनवेल अशा २ गाड्यांच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. जरीही प्रवाशांचं रेल्वेचं तिकिट कन्फर्म नसलं तरीही प्रवासी आरामात या एक्स्प्रेसने प्रवास करू शकणार आहेत. कोकणवासीयांचा एका अर्थी परतीचा प्रवास सुखकर होणार, हे नक्की. (Central Railway)


मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष रेल्वे १५ आणि १८ सप्टेंबर रोजी मडगाववरून दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. पुन्हा परत येताना ती रेल्वे १६ आणि १९ सप्टेंबर रोजी एलटीटीवरून सकाळी ७ वाजता सुटेल आणि रात्री ११:४५ च्या दरम्यान मडगाव स्थानकावर पोहचेल. ह्या एक्स्प्रेसचं बुकिंग करायचे झाल्यास ते आजपासून अर्थात ८ सप्टेंबरपासून प्रवाशांना करता येणार आहे. या एक्स्प्रेससोबत रेल्वे कडून आणखी एक विशेष मेमू लोकल चालवली जाणार आहे. (Kokan Railway)



दुपारच्या सुमारास चिपळूण ते पनवेलदरम्यान अनारक्षित मेमू लोकल चालवण्यात येणार आहे. ही मेमू १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर दरम्यान चिपळूणवरून सकाळच्या सुमारास ९ वाजता सुटेल आणि दुपारी २:३० वाजता पनवेलला पोहचेल. तर, पनवेलवरून ही मेमू ट्रेन परतीच्या प्रवासासाठी दुपारी ३:३० ला निघेल आणि रात्री १०:२० पर्यंत चिपळून स्थानकावर तुम्हाला पोहोचवेल. कोकण रेल्वेवरील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर ह्या दोन्हीही विशेष ट्रेनचे थांबे असणार आहेत. या विशेष रेल्वेमुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. (Ganpati Special Trains)

Comments
Add Comment

कोकणात 125 एकरात उभारणार फिल्म सिटी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कामाला वेग

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Ganpati Special Train: गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठा दिलासा, मुंबई- कोकण मार्गावर धावणार १२ विशेष गाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मध्य

Nitesh Rane News: गणेशभक्तांना घेऊन पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना, मंत्री नितेश राणे यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासाला यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’ची साथ

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai To Sawantwadi : गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठे गिफ्ट! मुंबई ते सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सेवा आजपासून सुरू; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची