Ashish Shelar : ‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून शिवनेरीतील बांधकामांची तपासणी; अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कारवाई - ॲड. आशिष शेलार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक आणि जागतिक वारसा महत्त्व लक्षात घेता, किल्ला परिसरातील अनधिकृत बांधकामे, कबर, दर्गे तसेच इतर संरचनांची तातडीने वस्तुनिष्ठ तपासणी करावी आणि त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. (Ashish Shelar)


शिवनेरी किल्ला आणि परिसरातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (ASI) अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीत किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि परिसरातील अनधिकृत संरचनांबाबत पुढील कार्यवाहीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. (Ashish Shelar)


शिवनेरी किल्ला हा जागतिक वारशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, संबंधित वास्तूच्या संरक्षित व बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम अथवा संरचना उभारली जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी दिल्या. किल्ला परिसरातील कबर, दर्गा तसेच इतर संरचना नेमक्या कोणत्या कालखंडात निर्माण झाल्या, त्याबाबत महसूल अभिलेख, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संरचना पूर्वीपासून अस्तित्वात होत्या की अलीकडच्या काळात निर्माण करण्यात आल्या, याची निश्चित पडताळणी करण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी दिल्या. (Ashish Shelar)



‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून संरचनांची तपासणी


या तपासणीसाठी केंद्र सरकारच्या ‘नेत्रम’ ॲपचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. उपग्रह छायाचित्रांच्या आधारे एखादी संरचना कोणत्या कालावधीपासून अस्तित्वात आहे, याबाबत माहिती मिळविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या ‘महास्टॅट’ यंत्रणेशी समन्वय साधून उपलब्ध तांत्रिक माहितीचा वापर करून संरचनांची कालानुक्रमिक पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. (Ashish Shelar)


भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवनेरी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित संरचना जागतिक वारसा स्थळाच्या बफर झोनच्या नियमांचे उल्लंघन करतात का; याबाबत अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण परिसराला भेट देऊन पाहणी करुन यातील काही गंभीर बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली होती. आज या बैठकीत उपस्थित राहून त्यांनी सदर बाबी त्यांनी बैठकीत मांडल्या.



सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश


शिवनेरीच्या वारसा संवर्धनाशी संबंधित बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. अनधिकृत असल्याचे निष्पन्न झालेल्या संरचनांबाबत नियमानुसार नोटीस बजावून, त्यावर सात दिवसांच्या आत पुनरावलोकन करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. (Ashish Shelar)


शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेला अत्यंत महत्त्वाचा वारसा असून, त्याचे पुरातत्त्वीय आणि जागतिक वारसा मूल्य अबाधित ठेवणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंत्री शेलार यांनी दिले आहेत. (Ashish Shelar)




Comments
Add Comment

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Devendra Fadnavis : पावसाचा खंड पडलेल्या विभागांतील पिकांचे सर्वेक्षण करा!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती मुंबई : राज्यातील

Amazon Food Safety Raid : ॲमेझॉन आणि इन्स्टामार्टला मोठा दणका! बंगळुरूमध्ये अन्नसुरक्षा विभागाची धाड; १.३८ कोटींचा माल जप्त!

बंगळुरू : बंगळुरू शहरात (Bengluru News) अन्न आणि औषध प्रशासनाने ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्स (Online Delivery Platfort) आणि त्यांच्या

PM Modi : 'नाराज फुफाजींना आता काम मिळालं!' PM Modi यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी; नक्की कुणावर साधला निशाणा ?

वडोदरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमधील वडोदरा येथे आयोजित 'नमो फॉर विकसित भारत' (Namo For Vikasit Bharat) या

Ashish Shelar : २५ हजार झोपडीधारकांना मोठा दिलासा! ‘अभय योजने’चा विस्तार; आशिष शेलारांचे निर्देश

मुंबई : परिशिष्ट-२ नंतर अपात्र ठरलेल्या झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे अभय योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या

Jalgaon : जाहीर केले 51 हजार, हातात दिले फक्त 5,100 ! जळगावात दहीहंडीवरून गोविंदांचा रस्ता रोको

Jalgaon : दहीहंडी उत्सवात सात थर लावून जीवाची बाजी लावणाऱ्या गोविंदांच्या हातात बक्षिसाच्या नावाखाली अवघे 5 हजार 100