नवी दिल्ली : नवी दिल्लीत आयोजित होणाऱ्या १८ व्या 'ब्रिक्स २०२६' (BRICS Summit) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात येत्या ११ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होणार आहे. मॉस्को येथून ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना क्रेमलिनचे (रशियन अध्यक्षांचे कार्यालय) प्रवक्ते डिमित्री पेस्कोव्ह यांनी या नियोजित बैठकीची अधिकृत माहिती दिली. या बैठकीत भारत आणि रशियामधील आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ करण्यासोबतच लष्करी व आर्थिक करारांवर सखोल चर्चा केली जाणार आहे.
सुखोई Su-57 विमानांचा व्यवहार आणि आर्थिक सहकार्यावर भर (BRICS Summit 2026)
या द्विपक्षीय बैठकीच्या मुख्य अजेंड्यावर रशियाकडून भारताला 'Su-57' ही अत्याधुनिक पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने विकण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव असणार आहे, असे पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले. यासोबतच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार, ऊर्जा क्षेत्र आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल. याच दरम्यान, रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के आयात शुल्क (Tariff) लादण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावित निर्णयावर रशियाने तीव्र आक्षेप घेतला आहे. अमेरिकेचे हे पाऊल पूर्णपणे बेकायदेशीर, चुकीचे आणि अमान्य असल्याचे पेस्कोव्ह यांनी स्पष्टपणे सांगितले.
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवातच अनोख्या योगाने होणार आहे! कारण तब्बल ३१ वर्षांनंतर हरतालिका आणि गणेश चतुर्थीचा दुर्मिळ योग एकाच दिवशी जुळून ...
भारताच्या यजमानपदाखाली १८ वी 'ब्रिक्स' परिषद
नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील 'भारत मंडपम' येथे १२ आणि १३ सप्टेंबर रोजी १८ वी ब्रिक्स परिषद पार पडणार आहे. भारताने १ जानेवारी रोजी ब्रिक्स संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले असून, भारत चौथ्यांदा या जागतिक परिषदेचे यजमानपद भूषवत आहे. या परिषदेत ११ पूर्णवेळ सदस्य देश आणि १० भागीदार देशांचे प्रमुख व वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, २०२५ मध्ये इंडोनेशिया हा देश ब्रिक्सचा नवा पूर्णवेळ सदस्य बनला आहे.
जागतिक नेत्यांची उपस्थिती; चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे लक्ष
शांततेचा संदेश आणि भारत-रशिया संबंधांची दिशा (BRICS Summit 2026)
याआधी पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांची भेट शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेदरम्यान झाली होती. त्या वेळी पंतप्रधान मोदींनी "युद्ध हा कोणत्याही समस्येचा मार्ग असू शकत नाही, शांततेचा मार्ग हाच मानवाच्या कल्याणाचा मार्ग आहे," असे सांगत युक्रेन युद्धावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. भारताने जागतिक स्तरावर नेहमीच शांततेच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला असून, आगामी द्विपक्षीय बैठकीतही व्यापार, सुरक्षा, संरक्षण आणि प्रादेशिक शांतता या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.