Suraj Chavan: सूरजच्या चिमुकल्या लेकीला पाहताच जान्हवी किल्लेकर भावूक; VIDEO चर्चेत

मुंबई : ‘झापूक झुपूक’ आणि ‘बिग बॉस मराठी’मुळे घराघरात पोहोचलेला रीलस्टार सूरज चव्हाणच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे. सूरज आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या घरी चिमुकल्या लेकीचे आगमन झाले आहे. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सूरज बाबा झाला असून ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला. (Suraj Chavan)


लग्नानंतर सुमारे 9 महिन्यांनी सूरज आणि संजना आई-बाबा झाले आहेत. लेकीच्या जन्मानंतर सूरजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रुग्णालयातील सूरजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून त्यामध्ये तो आपल्या पत्नी आणि नवजात बाळाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचताना दिसत आहे. बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि चाहत्यांचीही गर्दी झाल्याचे या व्हिडीओत दिसते. (Viral news)



सोशल मीडियावर आत्याबाईच्या चर्चा 


दरम्यान, सूरजच्या लेकीला भेटण्यासाठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरही रुग्णालयात पोहोचली. सूरजच्या लग्नापासून त्याच्या कुटुंबातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये जान्हवी सहभागी झाली आहे. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या व्हिडीओमध्ये ती दिसली नसल्याने काही चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘आत्याबाई कुठे?’ असा सवाल केला होता. (Jajahnavi Killekar)


यानंतर जान्हवीने वेळ काढून रुग्णालयात जाऊन सूरज आणि संजनाच्या बाळाची भेट घेतली. या खास क्षणाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी रुग्णालयात पोहोचते आणि संजनाला भेटल्यानंतर तिला मिठी मारताना दिसते. त्यानंतर ती नवजात बाळाला हातात घेते आणि काही क्षण प्रेमाने त्याच्याकडे पाहत राहते. ( Suraj Chavan Baby)



बाळाला हातात घेताच जान्हवी भावूक 


या वेळी जान्हवी भावूक झाल्याचेही दिसून आले. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. बाळाच्या जन्माचा आनंद व्यक्त करत जान्हवीने रुग्णालयात बर्फीही वाटली. तिच्या या व्हिडीओवर सूरजच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. सध्या सूरज आणि संजनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ( Entertainment News)


Comments
Add Comment

Nora Fatehi Defamation Case : नोरा फतेही अडचणीत! ‘लेगो विमान’ म्हणणं पडलं महागात; थेट ३ कोटींचा मानहानीचा दावा

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही सध्या कायदेशीर वादात अडकली आहे. एका विमान वाहतूक कंपनीने तिच्याविरोधात गांधीनगर

Anil Kapoor : सलमान खानच्या ‘बिग बॉस’ला अनिल कपूर देणार टक्कर! १०० स्पर्धक भिडणार, २६ कोटींसाठी रंगणार बुद्धीची लढाई

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस २०’ची जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानच्या होस्टिंगमुळे या रिॲलिटी शोने

Maharashtra State Marathi Film Awards 2026 : ९ सप्टेंबरला रंगणार ६२ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा; हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान यांना जीवनगौरव

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार

Devghar On Rent Marathi Movie : 'गौतमी पाटील'ची मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री! ‘देवघर ऑन रेंट’मधून अभिनयाच्या नव्या इनिंगला सुरुवात; अंगावर शहारे आणणाऱ्या टीझरची सर्वत्र चर्चा

मुंबई : पुढील काही महिन्यांत अनेक बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘देवघर

Popular Singer Death : कॉन्सर्टच्या काही तास आधी लोकप्रिय गायकाचा मृत्यू; तीव्र ताप आल्यानं दुबईत घेतला अखेरचा श्वास  

संगीत विश्वातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलीवूडचे दिग्गज पार्श्वगायक उदित नारायण

Mary Kom Bigg Boss 20 Entry : मेरी कोम उतरली ‘बिग बॉस २०’च्या आखाड्यात; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम आता सलमान