Tuesday, September 8, 2026

Ashish Shelar : २५ हजार झोपडीधारकांना मोठा दिलासा! ‘अभय योजने’चा विस्तार; आशिष शेलारांचे निर्देश

Ashish Shelar : २५ हजार झोपडीधारकांना मोठा दिलासा! ‘अभय योजने’चा विस्तार; आशिष शेलारांचे निर्देश

मुंबई : परिशिष्ट-२ नंतर अपात्र ठरलेल्या झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे अभय योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी योजनेचा विस्तार करण्याचे निर्देश पालकमंत्री, मुंबई उपनगर तसेच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (Ashish Shelar)

सन २००० पूर्वीच्या तसेच सन २००० ते २०११ या कालावधीतील झोपडीधारकांना, केवळ हस्तांतरणाच्या कारणामुळे अभय योजनेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री शेलार यांनी दिल्या. या निर्णयामुळे पात्र झोपडीधारकांना अभय योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. (Ashish Shelar)

सन २००० ते २०११ दरम्यानच्या सशुल्क पात्र-अपात्र झोपडीधारकांचाही अभय योजनेत समावेश करून त्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले. या निर्णयामुळे सुमारे २५ हजार वंचित झोपडीधारकांना अभय योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या पुनर्वसनाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. (Ashish Shelar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >