Tuesday, September 8, 2026

Ganpati Bappa Naivedya : यंदा बाप्पाला द्या चॉकलेट मोदकाचा नैवेद्य; झटपट आणि सोपी रेसिपी

Ganpati Bappa Naivedya : यंदा बाप्पाला द्या चॉकलेट मोदकाचा नैवेद्य; झटपट आणि सोपी रेसिपी
बाप्पासाठी चॉकलेट मोदक पारंपरिक मोदकासोबत यंदा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर चॉकलेट मोदक हा छान पर्याय आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे मोदक आवडतील. ( Chocolate Modak Recipe)
 साहित्य तयार ठेवा यासाठी १ कप मिल्क पावडर, ½ कप कंडेन्स्ड मिल्क, २ चमचे कोको पावडर, १ चमचा तूप आणि २ चमचे दूध घ्या.  मिश्रण तयार करा कढईत तूप गरम करून त्यात मिल्क पावडर, कोको पावडर आणि कंडेन्स्ड मिल्क घाला. हे मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट वाटू लागल्यास त्यात थोडे दूध घाला. मिश्रण कढईच्या बाजू सोडू लागेपर्यंत मंद आचेवर शिजवा.  मिश्रण थंड होऊ द्या गॅस बंद करून मिश्रण एका ताटात काढा. ते थोडे कोमट होऊ द्या. हाताला हलके तूप लावून मिश्रण मऊसर मळून घ्या.  मोदकाचा आकार द्या मोदकाच्या साच्याला थोडे तूप लावा. त्यात चॉकलेटचे मिश्रण भरून घट्ट दाबा आणि साचा उघडून सुंदर मोदक तयार करा.  ड्रायफ्रूट्सने सजवा मोदकावर बारीक कापलेले काजू, बदाम किंवा पिस्ते घालून सजावट करू शकता.  बाप्पाला नैवेद्य दाखवा तयार चॉकलेट मोदक सुंदर ताटात सजवा आणि गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करा.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >