Friday, October 23, 2026

iPhone Duo : Apple चा पहिला फोल्डेबल iPhone Duo बाजारात दाखल; खरेदीसाठी स्टोअर्सबाहेर ग्राहकांच्या रांगा

फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक अ‍ॅपल स्टोअर्सबाहेर रांगेत उभे असल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

iPhone Duo : अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचा दावा करणाऱ्या ‘आयफोन ड्युओ’च्या विक्रीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. भारतासह जगभरात 23 ऑक्टोबरपासून या फोनची विक्री सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. फोन खरेदी करण्यासाठी ग्राहक अ‍ॅपल स्टोअर्सबाहेर रांगेत उभे असल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आयफोन ड्युओची किंमत किती?

दिलेल्या माहितीनुसार, आयफोन ड्युओच्या 256GB व्हेरिएंटची किंमत 2,99,900 रुपये, 512GB व्हेरिएंटची किंमत 3,24,900 रुपये, 1TB व्हेरिएंटची किंमत 3,74,900 रुपये, तर 2TB व्हेरिएंटची किंमत 4,49,900 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

डिस्प्ले आणि प्रोसेसरची वैशिष्ट्ये

या फोनमध्ये 7.6 इंचांचा आतील डिस्प्ले आणि 5.4 इंचांचा बाहेरील डिस्प्ले असल्याचा दावा आहे. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करत असल्याचे सांगितले जाते. तसेच, यामध्ये A20 Pro चिपसेट देण्यात आल्याची माहिती दिली जात आहे.

कॅमेरा कसा आहे?

दिलेल्या माहितीनुसार, फोनच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. आतील डिस्प्लेमध्ये 4 मेगापिक्सेलचा, तर बाहेरील डिस्प्लेमध्ये 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, फोनचे नाव, वैशिष्ट्ये, किंमत आणि विक्रीची माहिती अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाइटवरून पडताळणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >