PM Modi Security Breach : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बनावट PMO अधिकाऱ्याचा रुबाब; मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक

एकाकडे बंदूक आढळल्याने खळबळ


मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पंतप्रधान उपस्थित असलेल्या व्हीव्हीआयपी परिसरातून पोलिसांनी एका बनावट अधिकाऱ्याला त्याच्या बंदुकधारी सुरक्षारक्षकासह ताब्यात घेतले आहे. स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) वरिष्ठ अधिकारी सांगणारा हा युवक थेट सुरक्षेचे कडे भेदून आत घुसल्याने केंद्रीय यंत्रणांसह मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे.



बनावट आयडी कार्ड अन् पीएमओ अधिकाऱ्याचा आव



रोहन पारेख नावाचा २४ वर्षीय तरुण एनएमएसीसी परिसरातील व्हीव्हीआयपी भागात अत्यंत आत्मविश्वासाने वावरत होता. तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांना त्याच्या वागण्या-बोलण्याचा संशय आल्याने त्यांनी त्याची अडवणूक करून विचारपूस केली. त्यावेळी त्याने स्वतःची ओळख थेट 'पीएमओ' अधिकारी म्हणून सांगत एक ओळखपत्र दाखवले. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने दाखवलेले पंतप्रधान कार्यालयाचे आयडी कार्ड पूर्णपणे बोगस आणि बनावट असल्याचे निष्पन्न झाले.



खाजगी बॉडीगार्ड आणि सुरक्षेत मोठी त्रुटी


या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या २४ वर्षांचा रोहन पारेख हा एकटा नव्हता, तर त्याने सुरक्षेचा आभास निर्माण करण्यासाठी सोबत एका खाजगी सुरक्षारक्षकाला (बॉडीगार्ड) तैनात केले होते. विशेष म्हणजे या बॉडीगार्डकडे एक बंदूकही आढळून आली आहे. अत्यंत कडक एसपीजी (SPG) सुरक्षा प्रोटोकॉल लागू असलेल्या ठिकाणी एखादी व्यक्ती बंदुकधारी सुरक्षारक्षकासह बनावट आयडीच्या आधारे थेट व्हीव्हीआयपी भागात पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी सुरू


पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील या गंभीर सुरक्षा त्रुटीनंतर स्थानिक पोलिसांसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तातडीने हरकतीत आल्या आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण घटनेचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे (Crime Branch) सोपवण्यात आला आहे. आरोपी रोहन पारेख याने हे बनावट ओळखपत्र कुठे तयार केले, त्याच्यासोबत बंदुकधारी व्यक्ती आणण्यामागचा मुख्य हेतू काय होता आणि तो कोणाच्या सांगण्यावरून अथवा मदतीने आतपर्यंत पोहोचला, या सर्व बाजूंचा गुन्हे शाखा सध्या कसून तपास करत आहे. दरम्यान, दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी करून बनावट ओळखपत्र, कार्यक्रमस्थळी प्रवेश आणि शस्त्र यांचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Kalyan News: कल्याण पूर्वेत दिवसाढवळ्या गणेशमूर्ती चोरीला, चोरट्याची करामत कॅमेऱ्यात कैद

कल्याण: कल्याण पूर्वेमध्ये भरदिवसा चोरट्याने दुकानातून गणपतीची मुर्ती चोरल्याची घटना घडली आहे. भरदिवसा

ASK Private Wealth Hurun India Cheetah Index : भारतातील 'चीता' स्टार्टअप्सची लाट! Hurun India रिपोर्टमध्ये ११० कंपन्यांची बाजी; बेंगळुरू ठरले नंबर १!

मुंबई : भारतातील वेगाने प्रगती करणाऱ्या आणि भविष्यात 'युनिकॉर्न' (Unicorn) बनण्याची क्षमता असलेल्या स्टार्टअप्सची नवी

Nitesh Rane on Aaditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणाशी संबंध नसेल तर आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका का दाखल केली ? मंत्री नितेश राणे यांचा सवाल

तत्कालीन महापौरांनी दिशाच्या आईवडिलांना धमक्या दिल्या मुंबई : दिशा सालियन (Disha Saliyan) मृत्यू प्रकरणाशी जर आदित्य

Nitesh Rane : गरब्यात मुस्लिमांना ‘नो-एन्ट्री’ - मंत्री नितेश राणे यांची भूमिका

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य असावे मुंबई : नवरात्रोत्सवातील गरबा आणि दांडिया

Maratha Reservation News : मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री खलबते

- महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती; मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत झाली चर्चा मुंबई : मराठा आंदोलक मनोज

Jogeshwari Trauma Hospital : जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात खरेदी केलेली २५ कोटींची मशिन धुळखात

महापौर रितू तावडे यांनी या मशिनचा त्वरीत वापर करण्याचे दिले निर्देश महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही