मुंबई : ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्या भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ( PM Modi Mumbai Visit)
पंतप्रधानांचा मुंबई दौरा
मुंबईत 8 ते 11 सप्टेंबरदरम्यान ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या फेस्टची ही 7 वी आवृत्ती असून वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला मंगळवारी सायंकाळी 5:45 वाजता सुरुवात होणार आहे. ( Narendra Modi)
PLI Scheme : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अधिकाऱ्यांसाठी असलेली PLI योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या योजनेच्या सध्याच्या रचनेवर बँक कर्मचारी ...
महत्वाच्या विषयावर करणार चर्चा
फिनटेक क्षेत्रातील बदल, डिजिटल व्यवहार आणि आर्थिक सेवांमधील नव्या तंत्रज्ञानावर या परिषदेत विचारमंथन केले जाणार आहे. एजेंटिक एआय, टोकेनायझेशन आणि क्वांटम तंत्रज्ञान हे यंदाच्या परिषदेतील प्रमुख विषय आहेत. भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्था आणि आर्थिक समावेशनाला आणखी चालना देण्यावरही परिषदेत भर दिला जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी गुजरातमधील वडोदरा दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यात गुजरातमधील सुमारे 35,200 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच ‘नमो 4 विकसित भारत’ या कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत.
पंतप्रधानांच्या वडोदरा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून शहरात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत नागरिकांसह स्वच्छता कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला.






