गोंदिया: गोंदिया- बालाघाट मार्गावरील नागरा- मोहरनटोली परिसरामध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि पिकअपच्या भीषण धडकेमध्ये जागीच सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. गोंदिया शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र- मध्यप्रदेश राज्य महामार्गावरील नागरा गावाजवळच घटना घडली आहे. सध्या सर्व जखमींवर जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. (Gondia News)
Pune Water Cut: ऐन पावसाळ्यात पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार, कोणकोणत्या भागांना बसणार फटका
पुणे: पुणेकरांना ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असताना शहरामध्ये पाणी कपात ...
सोमवारी मध्यरात्री गोंदियाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची कामगारांना नेणाऱ्या पिकअपला समोरून धडक बसली. ट्रकची पिकअपला इतकी जोरदार धडक होती की, या धडकेमध्ये पिकअपचा अक्षरश: चुराडा झाला होता. या जोरदार धडकेमध्ये, सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील हे सर्व कामगार रोजगाराच्या शोधामध्ये हैदराबादला जाण्यासाठी निघाले होते. पण कामाच्या शोधात जाणाऱ्या कामगारांसोबत वाटेतच अनर्थ घडला. (Road Accident News)
ट्रक-पिकअपच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन वर्षीय बालकाचाही समावेश आहे. ट्रक-पिकअपच्या धडकेमध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सध्या सर्व जखमी प्रवाशांवर गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. अपघाताची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून पोलीस निरीक्षक वैभव पवार आणि महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैतम यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. (Road Safety)
Panvel CSMT AC Local : पनवेल-CSMT एसी लोकल न थांबल्याने प्रवाशांमध्ये भीती; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
नवी मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेच्या मार्गावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) दिशेने जाणाऱ्या ...
दरम्यान, अपघात नेमका कोणाच्या
">निष्काळजीपणामुळे झाला ? याचा तपास ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे. या भीषण अपघातासंदर्भात जखमींच्या जबाबाच्या आधारे, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात भारतीय दंड संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा क्र. ५२७/२०२६ दाखल केला आहे. (Road Safety News)