Wednesday, September 9, 2026

DCM Eknath Shinde News: लंडनऐवजी झ्युरिकला विमान उतरले, हिथ्रो विमानतळावरील तांत्रिक बिघाडाचा एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना फटका

DCM Eknath Shinde News: लंडनऐवजी झ्युरिकला विमान उतरले, हिथ्रो विमानतळावरील तांत्रिक बिघाडाचा एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना फटका
मुंबई: लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा फटका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना बसला. शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी आणि छायाचित्रकारांसह सहा जणांचे विमान हिथ्रोऐवजी झ्युरिकला वळविण्यात आले. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यासाठी लंडनला पोहोचलेल्या शिष्टमंडळाला त्याचा फटका बसला. (Maharshtra News)
ब्रिटनच्या 'नॅशनल एअर ट्रॅफिक सर्व्हिसेस'च्या विमान वाहतूक नियंत्रणातील फ्लाइट प्रोसेसिंग प्रणालीत तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम हिथ्रोसह ब्रिटनमधील अनेक विमानतळांवरील विमानांच्या उड्डाणांवर झाला. हजारहून अधिक उड्डाणे रद्द किंवा प्रभावित झाली, तर अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले. हिथ्रो विमानतळानेही तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारी आगमनाची उड्डाणे काही काळ स्थगित केली होती. बुधवारी सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी विमानांची आणि कर्मचाऱ्यांची पुनर्व्यवस्था करावी लागत असल्याने विलंबाचा परिणाम कायम आहे. (DCM Eknath Shinde) या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या कार्यालयातील सहा जणांना घेऊन जाणारे विमान हिथ्रोऐवजी झ्युरिकला उतरविण्यात आले. त्यांना पुढे लंडनला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे विमान नियोजित वेळापत्रकानुसार लंडनला पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या कार्यक्रमावर या तांत्रिक बिघाडाचा परिणाम झालेला नसला तरी त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना मात्र अनपेक्षित प्रवासाला सामोरे जावे लागले.

ब्रिटिश संसदेत शिंदेंचा सन्मान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेत दोन दिवस विविध कार्यक्रमांत सन्मानित करण्यात येणार आहे. ९ सप्टेंबरला हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.  त्यानंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये त्यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. महाराष्ट्र मंडळातर्फे ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

">मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
म्हणून नागरिककेंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी शिंदे यांना हा सन्मान दिला जाणार असल्याचे निमंत्रकांकडून सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी शिंदे मंगळवारी रात्री लंडनला रवाना झाले. (Eknath Shinde Honoured in British Parliament)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा