Wednesday, September 9, 2026

गणेशोत्सव २०२६ : खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रयत्नांना यश! वसई-विरार महापालिकेकडून विसर्जन जेट्टीसह विशेष सुविधांची घोषणा

गणेशोत्सव २०२६ : खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रयत्नांना यश! वसई-विरार महापालिकेकडून विसर्जन जेट्टीसह विशेष सुविधांची घोषणा

पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (Hemant Sawra) यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav 2026) मंडळांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लावलेला पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला आहे. खासदार सावरा यांच्या या पुढाकारामुळे वसई-विरार (Vasai-Virar) शहरातील गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे पालिकेला पत्र

गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होऊ नये आणि प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या (VVCMC) आयुक्तांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी गणेश मंडळांना परवानग्या मिळणे, वाहतूक नियोजन आणि इतर आवश्यक प्रशासकीय उपाययोजना तत्काळ लागू करण्याची मागणी केली होती.

महानगरपालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि हेल्पलाइन नंबर जाहीर

खासदार सावरा यांच्या मागणीची तातडीने दखल घेत वसई-विरार पालिकेने अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करून विविध उपाययोजनांची घोषणा केली आहे. गणेशोत्सव मंडळांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पालिकेने स्वतंत्र 'आपत्ती व्यवस्थापन कक्ष' स्थापन केला आहे. तसेच, मदत आणि तक्रार निवारणासाठी 18002673898 आणि 18002334353 हे दोन टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.

तक्रार निवारणासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

उत्सवादरम्यान येणाऱ्या समस्यांचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याची सूचना खासदारांनी केली होती. त्यानुसार पालिकेने विविध भागांत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांना गणेश मंडळांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याचे आणि सर्व सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी रो-रो (Ro-Ro) जेट्टीची विशेष सोय

मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनादरम्यान गणेश मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यावर तोडगा म्हणून खासदार सावरा यांनी विसर्जनासाठी रो-रो (Ro-Ro) जेट्टी उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी केली होती. प्रशासनाने ही मागणी मान्य केली असून, 'महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड' आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने सुरक्षित विसर्जनासाठी विशेष व्यवस्था उभारली आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका आणि सुरक्षित गणेशोत्सव

वसई-विरार महापालिकेने घेतलेल्या या निर्णयांमुळे शहरातील गणेश मंडळांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन व्यवस्थांमुळे विसर्जन मिरवणुकांदरम्यान होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि इतर गैरसोयी कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >