Pune MPSC Student Suicide: पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधलं कारण वाचून सर्वच हादरले...

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक सारख्या महत्त्वाच्या शहरांत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून तरूण स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात. ग्रामीण भागांतून पुण्यामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या होतकरू तरुणाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव प्रथमेश देशमुख असं आहे.



पुण्याच्या नारायण पेठ परिसरामध्ये राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुणाने सुसाईड नोट लिहित आपले जीवन संपवले आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (मूळ रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे या तरुणाचं नाव असून, तो गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुण्यामध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. प्रथमेशने सततची आर्थिक टंचाई आणि डोक्यावर झालेला कर्जाचा भार यामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरूणाने आत्महत्येचं कारण सुसाईड नोटमध्ये स्पष्ट केले आहे. प्रथमेशने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षा वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेशने सततची आर्थिक टंचाई आणि डोक्यावर झालेल्या कर्जाच्या भारामुळे नैराश्यात येत आपले जीवन संपवले. पुण्यातील राहत्या खोलीचे थकलेले भाडे देण्यासाठी, खाण्यापिण्याचा खर्च आणि अभ्यासाचा वाढता ताण यामुळे त्याने ओळखीच्या लोकांकडून उसनवारी घेतली होती. उसने पैसे घेऊन त्याच्यावर तब्बल अडीच लाख रुपयांचे कर्ज झाले होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याने स्पर्धा परीक्षा सोडून गावी परत जाण्याचा निर्णयही त्याने घेतला होता, हा निर्णय प्रथमेशने आपल्या जवळच्या मित्रांजवळही बोलून दाखवला होता. घटनास्थळावर पोलिसांना त्याने लिहिलेली सुसाईड नोट सुद्धा मिळाली आहे.



सुसाईड नोटमध्ये त्याने ज्यांच्याकडून उसने पैसे घेतले होते, त्यांचं नाव आणि रक्कम सुद्धा नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून

&t=3s">सुसाईड नोट
मधील मजकूराची तपासणी केली जात असून देशमुख कुटुंबीयांची, इतर नातेवाईकांची आणि ज्यांच्याकडून उधार पैसे घेतले आहेत, त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

Dadaji Bhuse : राज्यातील सर्व शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करणार; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

नागूपर : नागपूर येथील लालबहादूर शास्त्री हिंदी शाळेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळांचा विकास करून त्या ‘मॉडेल

Justice Mahesh Chandra Tripathi : न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभात अलाहाबाद उच्च

गणेशोत्सवात होणार भक्तांची मोफत आरोग्य तपासणी? कुठे मिळणार फायदा

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारकडून भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत 'मुख्यमंत्री सहाय्यता

Minister Gulabrao Patil : 'डीजेच्या आवाजाने एका कानाने ४०% ऐकू येईना !’ गुलाबराव पाटलांची आपबिती; गणेशोत्सवाआधी तरुणांना आवाहन

Minister Gulabrao Patil : डीजेचा दणदणाट हा काहींसाठी उत्सवाचा जल्लोष असतो पण याच आवाजाचा त्रास किती गंभीर असू शकतो, याची आपबिती

Devendra Fadnavis : यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, संभाव्य साखर टंचाई रोखण्यासाठी निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य साखर टंचाई रोखण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याबाबत

Ban on Dolby sound systems : धुळ्यात गणेश मंडळांना मोठा धक्का ! डॉल्बी आणि लेझर लाईटवर थेट बंदी, उल्लंघन केल्यास गुन्हा

Ban on Dolby sound systems : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असतानाच धुळे जिल्हा पोलिसांनी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय