Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ दस्तऐवजांचा नवीन खंड २० ऑक्टोबर रोजी होणार प्रकाशित

Mumbai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे घेतलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्रे आणि महत्त्वपूर्ण दस्तऐवज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या.(Chandrakant Patil)



या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.(Chandrakant Patil)



डॉ. आंबेडकरांच्या धम्मदीक्षेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर उपलब्ध असलेला दुर्मिळ पत्रव्यवहार आणि कागदपत्रे जतन करून हा ऐतिहासिक ठेवा सर्वांसमोर आणण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे काम अधिक वेगाने पूर्ण करून आगामी २० ऑक्टोबर २०२६ रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर हा नवीन खंड प्रकाशित करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.(Dr Babasaheb Ambedkar)



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा दुर्मिळ साहित्याचे संकलन आणि संवर्धन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकाशनयोजनामुळे नागपूर येथील ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याशी संबंधित अनेक मोलाचे संदर्भ अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.(Chandrakant Patil)

Comments
Add Comment

Infrastructure Projects : रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग, बंदरांसाठी पर्यायी वनीकरणाची जमीन शोधण्याची चिंता मिटणार; राज्यात दरवर्षी ५ हजार हेक्टर पर्यायी वनीकरणाची गरज

पायाभूत प्रकल्पांसाठी ४० हजार हेक्टरची ‘लँड बँक’ मुंबई : पायाभूत विकास प्रकल्पांसाठी वनजमीन वळतीकरणाची

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर; १३ आणि १४ सप्टेंबरला विविध कार्यक्रम

एशियाटिक सोसायटी, हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) १३ आणि १४

DevendraFadnavis : एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

मुंबई : डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक,

Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वास्तूंची जतन-संवर्धन कामे दर्जेदार करावीत; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले निर्देश

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई’ अंतर्गत शाळा,

Ganeshotsav 2026: Mira Bhayandar गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज, २४ ठिकाणी तलावांचा समावेश; वाचा यादी

मीरा भाईंदर: मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून गणेशोत्सवाच्या आधीपासूनच गणेशमूर्ती विसर्जनाच्या उपाययोजना

Pratap Sarnaik : चालकांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व; ॲपआधारित टॅक्सी चालकांची संपूर्ण माहिती तीन महिन्यांत सादर करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या