मुंबई : मुंबई आणि ठाण्यातील काही खाद्य आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) शी संबंधित 5 आस्थापने तसेच जुहू येथील इस्कॉन परिसरातील खाद्य विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अस्वच्छता, अन्न साठवणुकीतील त्रुटी, कीटकांचा प्रादुर्भाव, तुंबलेली गटारे आणि आवश्यक नोंदींचा अभाव यांसारख्या बाबी समोर आल्या. (FDA Action)
कुर्ला पश्चिम येथील आरके असोसिएट्स अँड हॉटेलियर्स प्रायव्हेट लिमिटेडविरोधात FDA ने कठोर कारवाई केली आहे. 2 सप्टेंबर रोजी झालेल्या तपासणीनंतर पुन्हा पाहणी करण्यात आली. त्यावेळीही गंभीर त्रुटी कायम असल्याचे आढळल्याने या आस्थापनेचा परवाना 8 सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईत गणेशमूर्तीच्या अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलाव परिसरात धारावीच्या प्रेम नगरचा महाराजा या ...
IRCTC शी संबंधित चेंबूरमधील ओम साई राम एंटरप्रायझेस, अंबुज हॉटेल्स अँड रिअल इस्टेट प्रा. लि., पवई येथील एक्सप्रेस फूड सर्व्हिसेस आणि ठाणे पूर्वेतील अराहा हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या 4 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.
जुहूच्या इस्कॉनमध्ये FDAची तपसाणी
दरम्यान, 3 सप्टेंबर रोजी इस्कॉन जुहू परिसरातील खाद्य आस्थापनांचीही तपासणी करण्यात आली. या कारवाईत 3 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. तपासणीदरम्यान कच्चे आणि शिजवलेले अन्न योग्य पद्धतीने वेगळे न ठेवणे, अन्न व पिण्याच्या पाण्याची पुरेशी तपासणी न होणे, पाणी साचणे आणि तुंबलेले नाले यासह विविध त्रुटी आढळल्या.
एका साठवणूक कक्षात कीटकांची विष्ठा आढळल्याचेही तपासणीत समोर आले. तसेच स्वयंपाकघराचा मागील दरवाजा उघडा असल्याने कीटक आत येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक संरक्षक पोशाख नसल्याचेही आढळले.
गोविंदा रेस्टॉरंटवर छापा
गोविंदा रेस्टॉरंटमध्येही कच्च्या मालाची तपासणी, अन्न साठवणूक, गटार व्यवस्था आणि कीटक नियंत्रणासंदर्भात त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी, लसीकरण आणि अन्न सुरक्षा प्रशिक्षणाच्या नोंदीही अपुऱ्या असल्याचे निदर्शनास आले.
FDA ने संबंधित आस्थापनांना नियमांनुसार त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न सुरक्षा मानकांचे पालन केल्यानंतरच पुढील परवानगीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मोठ्या संख्येने नागरिक आणि प्रवासी या ठिकाणी अन्नपदार्थांचा वापर करत असल्याने FDA ची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.





