मीरा भाईंदर: मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून गणेशोत्सवाच्या आधीपासूनच गणेशमूर्ती विसर्जनाच्या उपाययोजना करायला सुरूवात केल्या आहेत (Mira-Bhayandar Municipal Corporation- MBMC). येत्या १४ सप्टेंबरला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे (Ganeshotsav 2026). मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रामध्ये कृत्रिम तलाव आणि नैसर्गिक तलावांचा समावेश करत गणेशमुर्ती विसर्जनासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.
Animal Cruelty Case : गोवंडीत क्रूरतेचा कळस! सराईत मांजर मारेकऱ्याचा शोध सुरू, माहिती देणाऱ्याला घसघशीत बक्षीस
मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात एकाच भागात अवघ्या काही दिवसांच्या अंतराने सहा मुक्या मांजरांच्या निर्घृण हत्येची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या ...
मीरा भाईंदर शहरामध्ये गणेश मूर्तींचे सुरळीत आणि सुरक्षित विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली आहे. शहरामध्ये एकूण २४ विसर्जन स्थळे तयार करण्यात आली असून, त्यामध्ये ५ नैसर्गिक जलाशय आणि १९ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. गणेश मूर्तींचे विसर्जन प्रक्रिया सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावी, यासाठी पालिका प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. विसर्जन स्थळांवर स्वतंत्र सुविधा निर्माण करण्यात आल्या असून, मोठ्या संख्येने घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल, या दृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.
६ फुटांखालील मूर्तीच्या विसर्जनासाठी विविध ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करणार आहेत. यामध्ये नेताजी सभाषचंद्र बोस मैदान, एसटीची मोकळी जागा, भाईंदर पूर्वेकडील बाळासाहेब ठाकरे मैदान, मेजर ध्यानचंद मैदान, जेसल पार्क चौपाटी, बालाजी मैदान, मीरा रोड येथील डॉन बॉस्को शाळेसमोरील जागा, शिवार गार्डन, मोर्चा गावातील पाटील मैदान, रामदेव पार्क परिसर, भाईंदर पश्चिमेकडील नगरभवन तलाव, भाईंदर पूर्वेकडील जुना नवघर तलाव, एस. एन. कॉलेजसमोरील मैदान, घोडबंदर येथील पद्मावती तलाव, नासका तलाव, काशिमीरा येथील जरीमरी तलाव, मिरागाव येथील सातकरी तलाव आणि पेणकरपाडा येथील सुकाळा तलाव आदी ठिकाणांचा समावेश आहे.
Fintech India : फिनटेकमध्ये भारताची प्रगती थक्क करणारी!
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राला ‘टोकनाइज्ड’ राज्य बनविण्याच्या दिशेने पुढची पायरी
मुंबई : फिनटेक क्षेत्रात भारताने केलेली प्रगती थक्क ...
तर, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये उत्तन समुद्रकिनारा, भाईंदर पश्चिम खाडी किनारा, भाईंदर पूर्व खाडी किनारा, घोडबंदर येथील रेतीबंदर खाडी किनारा आणि चेना नदी या ठिकाणांचा समावेश आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यात येणार आहे. अपघात टाळण्यासाठी भाविकांना थेट पाण्यात उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडूनच गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहेत. विसर्जन स्थळी पोलीस सुरक्षा, वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका देखील तैनात करण्यात येणार आहेत. महापालिकेकडून नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीनेच विसर्जन करण्याचे प्रोत्साहन दिले जात आहे. शिवाय. पालिकेकडून गणेश विसर्जनासाठी मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी करण्यात आल्या आहेत.
महापालिकेने नागरिकांना आणि गणेश मंडळांना आवाहन केले की, त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षा व पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, जेणेकरून हा उत्सव शांततेत आणि जबाबदारीने साजरा करता येईल.