प्राप्त माहितीनुसार, स्थानिकांना कामा वाडी व पांजरापोळ परिसरात एकामागून एक मृत मांजरे आढळली. एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला चार मांजरे मृतावस्थेत सापडली होती. त्यानंतरच्या घटनेत एका पिल्लासह दोन मृत मांजरे गंभीर जखमी आणि विद्रूप अवस्थेत आढळून आली. एका मांजराच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, तर इतरांच्या शरीरावरही गंभीर जखमा आढळल्या. या अमानुष प्रकारानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Animal Cruelty Case)
- मंत्री शंभूराज देसाई; टीका करण्यापेक्षा सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या ...
संबंधित पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमां तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्यानुसार, कोणत्याही मुक्या प्राण्याला मारणे, विषप्रयोग करणे किंवा अपंग करणे हा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची व दंडाची तरतूद आहे. पोलीस आरोपीचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करत आहेत.(Animal Cruelty Case)
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत एका प्रमुख प्राणी कल्याण संस्थेने आरोपीच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास ५०,००० रुपयांचे भरघोस रोख बक्षीस जाहीर केले आहे. मारेकऱ्याबद्दलची कोणतीही गोपनीय माहिती थेट संबंधित ईमेल आयडीवर किंवा पोलिसांकडे देण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.(Animal Cruelty Case)
मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रामध्ये ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा प्रचंड गाजताना दिसत आहे. ...
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणारे घटक भविष्यात इतर सजीवांसाठीही धोकादायक ठरू शकतात, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. समाजात अशा प्रकारची हिंसक प्रवृत्ती रोखण्यासाठी आणि मुक्या प्राण्यांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(Animal Cruelty Case)






