Wednesday, September 9, 2026

मुंबईत लाडक्या गणरायाची तयारी अंतिम टप्प्यात, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला तयारीचा आढावा

मुंबईत लाडक्या गणरायाची तयारी अंतिम टप्प्यात, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला तयारीचा आढावा
मुंबई: लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक असताना आता महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सध्या पाहणी केली जात आहे. आमदार, खासदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. आता अशातच मुंबईतही गणेशोत्सवाची जोरदार धूम पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून भाविक मुंबईमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापतींनी आढावा बैठक घेतली. (Mumbai News)
गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात आली असताना भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज विधानभवनामध्ये आढावा बैठक घेतली. बैठकीत सचिन अहिर यांनी रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे, विसर्जन स्थळांवरील सोयी-सुविधा, विद्युत व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि कायदा-सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. भाविकांची गर्दी लक्षात घेता विसर्जन मार्गांवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी त्वरित पूर्ण करावी आणि विसर्जन घाटांवर पुरेशा प्रमाणात जीवरक्षक (लाइफगार्ड्स), प्रकाश व्यवस्था व प्रथमोपचार केंद्र तैनात ठेवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले. (Ganeshotsav 2026)
तसेच, सार्वजनिक उत्सव मंडळांना परवानग्या मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी 'एक खिडकी योजना' अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिक आणि गणेश भक्तांना यंदाचा उत्सव अधिक उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा, यासाठी पालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपसभापती सचिन अहिर यांनी केले. १४ सप्टेंबरला घरगुतीसह मोठमोठ्या गणेश मंडळांमध्ये गणरायाचे आगमन होणार आहे. यादृष्टीने बीएमसीकडून कृत्रिम तलावांचे, नैसर्गिक तलावांचे आणि समुद्र किनाऱ्यावर विसर्जनासाठी जोरदार तयारी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोणता

&t=2s">अनुचित प्रकार
टाळण्यासाठी भाविकांना थेट पाण्यात उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. (Mumbai Ganeshotsav) [caption id="attachment_1058084" align="alignnone" width="300"]preparations for the beloved lord ganesha are in the final stages in mumbai legislative council deputy chairman sachin ahir reviewed the arrangements preparations for the beloved lord ganesha are in the final stages in mumbai legislative council deputy chairman sachin ahir reviewed the arrangements[/caption]
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >