Wednesday, September 9, 2026

Jaykumar Gore : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट

Jaykumar Gore : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट

Mumbai : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.(Jaykumar Gore)

?si=679VxwyT2DkWlRSk

या सदिच्छा भेटीदरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी अण्णांवर उपचार करणारे प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी यांच्याशी चर्चा करून अण्णांच्या प्रकृतीची आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची सविस्तर माहिती जाणून घेतली.(Bombay Hospital Anna Hazare)

अण्णा हजारे यांनी आपल्या संपूर्ण जीवनकार्यातून समाजहित, भ्रष्टाचारविरोधी लढा आणि लोकजागृतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अमूल्य विचारांची आणि मार्गदर्शनाची समाजाला आजही नितांत गरज असल्याचे सांगत, त्यांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा समाजकार्यात सक्रिय व्हावे, यासाठी मंत्री गोरे यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.(Bombay Hospital Anna Hazare)

या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी खाजगी सचिव सुनील कोठेकर, ओएसडी किशोर बोरहाटणे यांच्यासह इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >