Wednesday, September 9, 2026

Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला बाप्पाची मूर्ती घरी आणण्यापूर्वी ‘हे’ नक्की तपासा; दुर्लक्ष केल्यास ऐनवेळी होईल मोठा गोंधळ

Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला बाप्पाची मूर्ती घरी आणण्यापूर्वी ‘हे’ नक्की तपासा; दुर्लक्ष केल्यास ऐनवेळी होईल मोठा गोंधळ
Ganesh Chaturthi 2026 : गणेशभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो दिवस आता जवळ आला आहे. गणेश चतुर्थीपासून घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार असून यंदा 14 सप्टेंबर 2026 पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. काही घरांमध्ये दीड दिवस, तर काही ठिकाणी 5, 7 किंवा 10 दिवस बाप्पाची स्थापना केली जाते. त्यामुळे मूर्ती खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. (Ganesh Chaturthi 2026) गणेश मूर्ती आणताना नेमकी कोणती काळजी घ्यावी  धार्मिक मान्यतेनुसार, घरासाठी गणपतीची मूर्ती निवडताना तिच्या सोंडेची दिशा पाहिली जाते. डावीकडे वळलेली सोंड असलेली मूर्ती घरासाठी शुभ मानली जाते. अशी मूर्ती घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते, अशी श्रद्धा आहे. सरळ सोंड असलेली मूर्तीही काही जण पूजेसाठी निवडतात. (Ganpati Bappa Morya)
गणपतीच्या मूर्तीसोबत उंदराची मूर्ती आणि हातात मोदक असणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार अशा स्वरूपातील गणपतीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते आणि व्यवसायात प्रगती होते, असे मानले जाते. (Ganeshostav 2026) मूर्तीच्या रंगालाही धार्मिक परंपरेत महत्त्व दिले जाते. शेंदरी किंवा लाल रंगाची मूर्ती शुभ मानली जाते. याशिवाय पांढऱ्या रंगाची गणपतीची मूर्तीही शांतता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. गणपतीची मूर्ती शक्यतो बसलेल्या अवस्थेतील निवडण्याची परंपरा आहे. अशी मुद्रा स्थिरता, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. मूर्ती घेताना ती तुटलेली किंवा खराब झालेली नसावी, याचीही काळजी घ्यावी. पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू माती किंवा नैसर्गिक मातीची मूर्ती घेणे अधिक योग्य ठरते. (Ganpati Idol) गणेश चतुर्थीचीचा शुभ वेळ  गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची स्थापना आणि पूजा करण्यासाठी मध्यान्ह काळ शुभ मानला जातो. यंदा 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची पूजा आणि स्थापना करण्यासाठी सकाळी 11:16 ते दुपारी 1:44 हा मुहूर्त असल्याचे पंचांगानुसार सांगण्यात आले आहे. हा मुहूर्त 2 तास 28 मिनिटांचा आहे. (Ganesh Murti Pooja) गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना धार्मिक श्रद्धेसोबत पर्यावरणाचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शक्यतो पर्यावरणपूरक मूर्तीची निवड करून उत्सव आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा करा. (Eco Friendly Ganpati)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >