गणेश मूर्ती आणताना नेमकी कोणती काळजी घ्यावी
धार्मिक मान्यतेनुसार, घरासाठी गणपतीची मूर्ती निवडताना तिच्या सोंडेची दिशा पाहिली जाते. डावीकडे वळलेली सोंड असलेली मूर्ती घरासाठी शुभ मानली जाते. अशी मूर्ती घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते, अशी श्रद्धा आहे. सरळ सोंड असलेली मूर्तीही काही जण पूजेसाठी निवडतात. (Ganpati Bappa Morya)
मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांच्या ...
गणपतीच्या मूर्तीसोबत उंदराची मूर्ती आणि हातात मोदक असणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार अशा स्वरूपातील गणपतीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते आणि व्यवसायात प्रगती होते, असे मानले जाते. (Ganeshostav 2026)
मूर्तीच्या रंगालाही धार्मिक परंपरेत महत्त्व दिले जाते. शेंदरी किंवा लाल रंगाची मूर्ती शुभ मानली जाते. याशिवाय पांढऱ्या रंगाची गणपतीची मूर्तीही शांतता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते.
गणपतीची मूर्ती शक्यतो बसलेल्या अवस्थेतील निवडण्याची परंपरा आहे. अशी मुद्रा स्थिरता, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. मूर्ती घेताना ती तुटलेली किंवा खराब झालेली नसावी, याचीही काळजी घ्यावी. पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू माती किंवा नैसर्गिक मातीची मूर्ती घेणे अधिक योग्य ठरते. (Ganpati Idol)
गणेश चतुर्थीचीचा शुभ वेळ
गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची स्थापना आणि पूजा करण्यासाठी मध्यान्ह काळ शुभ मानला जातो. यंदा 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची पूजा आणि स्थापना करण्यासाठी सकाळी 11:16 ते दुपारी 1:44 हा मुहूर्त असल्याचे पंचांगानुसार सांगण्यात आले आहे. हा मुहूर्त 2 तास 28 मिनिटांचा आहे. (Ganesh Murti Pooja)
गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करताना धार्मिक श्रद्धेसोबत पर्यावरणाचीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शक्यतो पर्यावरणपूरक मूर्तीची निवड करून उत्सव आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरा करा. (Eco Friendly Ganpati)