Sunetra Pawar : पुण्याच्या विकासासाठी पीएमआरडीएचा मास्टर प्लॅन गतिमान करा; सुनेत्रा अजित पवारांचे निर्देश

पुणे  : पुणे महानगर प्रदेशाच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) मास्टर प्लॅन गतिमान करून पायाभूत सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेशातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. PMRDAच्या कार्यक्षेत्रात ६७४ गावांचा समावेश असून सुमारे ५,२१५ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. पुणे प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि पर्यटनाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन पुढील अनेक वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. (Sunetra Pawar)



इनर रिंग रोडसह वाहतूक व्यवस्थेला गती


पुणे इनर रिंग रोड, कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनअंतर्गत प्रस्तावित प्रकल्प, हिंगणगाव पूल आणि यवत रेल्वे ब्रिज यांसारख्या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहर आणि PMRDA क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मल्टिमोडल हब, औद्योगिक क्षेत्रे, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे आणि विमानतळ यांना जोडणारी प्रभावी कनेक्टिव्हिटी विकसित करण्यावर भर देण्यात आला. (Sunetra Pawar)



माण-हिंजवडी मेट्रोला गती देण्याचे निर्देश


माण-हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता माण-हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३चे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. २३ स्थानकांच्या या मार्गिकेतील १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून आणखी ५ स्थानके अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित कामे वेगाने पूर्ण करून मेट्रो सेवा लवकर सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही सांगण्यात आले. (Sunetra Pawar)



नद्यांचे प्रदूषण रोखण्याला प्राधान्य


इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. केवळ प्रकल्प उभारणे पुरेसे नसून त्यांचे भविष्यातील संचालन, देखभाल-दुरुस्ती आणि खर्च भागविण्यासाठी संबंधित यंत्रणा आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण असणे आवश्यक असल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.



१२ नवीन अग्निशमन केंद्रे प्रस्तावित


PMRDA क्षेत्रातील वाढते नागरीकरण लक्षात घेता अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्राचे काम सुरू असून, आणखी १२ अग्निशमन केंद्रे प्रस्तावित आहेत. या केंद्रांच्या कामांना गती देऊन नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. (Sunetra Pawar)



भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन


PMRDA क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील नागरी विस्तार लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवीन जलस्रोत उपलब्ध करणे, वितरण व्यवस्था सक्षम करणे तसेच नवीन नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे आणि पर्यटनस्थळांच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करण्यावर भर देण्यात आला.


पुणे महानगर प्रदेशाचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरता मर्यादित न ठेवता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांचे जीवनमान या सर्व बाबींचा समन्वय साधून सर्वंकष विकास करावा, असे निर्देश सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. (Sunetra Pawar)

Comments
Add Comment

Ramabai Ranveer : रामाबाईंच्या जिद्दीची सचिन तेंडुलकरने घेतली दखल; मुलींसह चौघांना दिली खास भेट

बीड : मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉनमध्ये धावून ३ हजार रुपयांचे बक्षीस जिंकणाऱ्या बीड जिल्ह्यातील

CM Devendra Fadnavis : 'एमपीएससी'च्या जुन्या परीक्षांमधील गुणांचेही ‘री-चेकिंग’ होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक, आठ दिवसांत कारवाईचे

FDA action : अन्न व औषध प्रशासनाचा दणका! शिळ-दिवा परिसरातील २० लाखांचा अस्वच्छ अन्नसाठा जप्त; मुंबई-पुण्यातील नामवंत हॉटेल्सचे परवाने निलंबित

Mumbai : सणासुदीचा काळ जवळ येत असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम

CM Devendra Fadnavis : गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हातांनी साकारले बाप्पा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा

दुबई, अमेरिका की भारत... iphone 18 pro ची सीरीज सर्वाधिक महाग कोणत्या देशात?

मुंबई: ॲपलकडून नव्या iphone 18 pro ची सीरीज लाँच करण्यात आली. काल आयफोन लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार

Navi Mumbai accident : सीबीडी बेलापूरमध्ये भीषण तिहेरी अपघात; ऑटोरिक्षाचालकाचा मृत्यू, दोन महिला जखमी

Navi Mumbai : नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात तीन वाहनांच्या भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. आगरी कोळी गावाजवळील