रस्ते, जेट्टी, पोहोचरस्ते आणि प्रवासी सुविधांच्या १०४ कामांना मंजुरी
मुंबई : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक रस्ते, जेट्टी, पोहोचरस्ते तसेच प्रवासी सुविधांच्या विकासाला राज्य सरकारने गती देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन योजनांमधील एकूण १०४ कामांसाठी १७० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने गुरुवारी मान्यता दिली आहे. यापैकी बंदरांपर्यंत रस्ते आणि रेल्वेमार्ग तसेच बॅकवॉटर विकासासाठी ४४ कोटी, तर सहायक अनुदान, तरंगत्या जेट्टी आणि तत्सम प्रवासी सुविधांसाठी १२६ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
पहिल्या योजनेत एकूण २९ कामांसाठी ४४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या कामांची प्रशासकीय मान्यता एकूण ५१७.४५ कोटी रुपये असून, मार्च २०२६ अखेर त्यापैकी ११४.३१ कोटी रुपये प्राप्त झाले होते. आता २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेत ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील बंदरांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, जेट्टीपर्यंत पोहोचरस्ते, संरक्षण भिंती, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध सैफी रुग्णालयाने (Saifee Hospital) आपल्या एका प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) महिला डॉक्टरविरुद्ध मुंबई उच्च ...
पालघरमधील विविध कामांसाठी निधी देण्यात आला असून, शंकर मंदिर ते दांडापर्यंतचा रस्ता, पांजू येथील रस्ता, चिंचणी येथील खाडीनाका ते मोरीपाडा रस्ता, सातपाटी बंदराकडे जाणारा रस्ता, वडराई परिसरातील रस्ते, खारेकुरण, वाढीव, राजोडी, कळंब, नारंगी रो-रो जेट्टी आणि मनोर येथील जेट्टी अशा कामांचा त्यात समावेश आहे. यापैकी अनेक कामे ९० ते १०० टक्के प्रगतीपथावर आहेत.
रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, पेण, महाड आणि उरण परिसरातील बंदरांशी जोडणाऱ्या रस्ते आणि जेट्टीच्या कामांनाही निधी मिळणार आहे. रेवदंडा येथील रो-रो जेट्टी व संबंधित सुविधा, बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, धरमतर, सव, आगरदांडा, नवगाव, करंजा तसेच करंजा ते कासवलेपाडा या मार्गावरील कामांचा त्यात समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देऊड, टेंभे, जांभारी, गोळेवाडी-भातगाव, दांडेकर, दापोली आणि राजापूर परिसरातील बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. काही ठिकाणी काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण, तर काही ठिकाणी जेट्टीपर्यंत जोडरस्ते तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दुसऱ्या शासन निर्णयानुसार ७५ कामांसाठी १२६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या कामांची एकूण प्रशासकीय मान्यता ५७७.५३ कोटी रुपये असून, मार्च २०२६ अखेर १३३.९२ कोटी रुपये प्राप्त झाले होते. या निधीतून जेट्टींची दुरुस्ती व मजबुतीकरण, प्रवासी सुविधा, वाहनतळ, पोहोचरस्ते, संरक्षण भिंती आणि जलमार्गाशी संबंधित पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत.
या योजनेत मुंबई, ठाणे आणि पालघरमधील कामांबरोबरच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा वाटा मिळाला आहे. मुंबईतील गीतानगर-कुलाबा येथील संरक्षक भिंतीची दुरुस्ती आणि खारदांडा येथील जेट्टीची दुरुस्ती व धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम यांचा समावेश आहे. बेलापूर येथील प्रवासी जेट्टीसाठी सुविधा, डोंबिवली परिसरातील पोहोचरस्ते, कचोरे-कोळीवाडा येथील खाडीकिनारी मजबुतीकरण आणि उत्तन परिसरातील जेट्टी व पोहोचरस्त्याची कामेही या निधीतून होणार आहेत.
पालघरमध्ये वसई किल्ला, नायगाव, वसई रो-रो जेट्टी, नारंगी आणि अर्नाळा किल्ला परिसरातील जेट्टी, पोहोचरस्ते आणि प्रवासी सुविधांच्या कामांना निधी देण्यात आला आहे. रायगडमध्ये वसोली, नवेदर-नवगाव, कोळगाव-मांडवा, मोरा, रेवस, तळेखार, दासगाव, बोर्डणी, मुरुडखोरा, दिघी आणि आक्षीसागर यांसह अनेक ठिकाणी जेट्टी व संबंधित सुविधांची कामे सुरू आहेत.
सिंधुदुर्गातील ३१ कामांना निधी
दुसऱ्या योजनेतील कामांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष वाटा दिसून येतो. सावंतवाडी, वेंगुर्ला आणि देवगड तालुक्यांतील जेट्टी, प्रवासी शेड, पोहोचरस्ते आणि संरक्षण भिंतींच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाची मोठ्या संख्येने कामे या यादीत आहेत. आजगाव, कोचरा, मुटाट-भटवाडी, टेंबवली-मोडतर, पाल-झेंडोंबा मंदिर, वीरवाडी, संतवाडी, किनळे, ताम्हणेतर, सागरतीर्थ, सारंगवाडी-टेंबवली, अनपूर, तिलोट-आंबेरी, मोंडतर, बांदरकरवाडी, मिठबाव, वाडातर, मुणगे आडबंदर, वाघोटण, मळई, आनंदवाडी, हिदळे-मोरवेवाडी, मणचे आ






