Dhule Crime : धुळे जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हायवा वाहनातून गौण खनिजाची वाहतूक सुरळीत सुरू राहावी तसेच अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत कोणतीही कारवाई अथवा गुन्हा दाखल करू नये, यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तलाठी आणि त्याच्या खाजगी पंटरसह फरार झालेल्या दुसऱ्या तलाठीलाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ((Anti-Corruption Bureau)) ताब्यात घेतले आहे. तिघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. (Dhule Crime News)
Nashik : रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्ता (Saptashrungigad to Nanduri Ghat Road) तब्बल १६ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता ...
नेमकं प्रकरण काय ?
एसीबीकडे या संबंधित तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची खात्री केल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) फागणे येथे सापळा रचून तलाठी दिनेश दिलवर दाभाडे (४०) आणि त्याचा खाजगी पंटर जयेश कैलास चौधरी (३४) यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईदरम्यान या प्रकरणातील आणखी एक तलाठी मृणाल शरद नगराळे हा घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याच्याविरुद्धही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नगराळे हा स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. (Dhule Crime News)
मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमधील एका अनधिकृत मशिदीच्या पाडकामानंतर मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांना मिळालेल्या जीवे ...
तीन दिवसांची पोलीस कोठडी
यानंतर या तिघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे या तपासात एका तहसीलदाराचे नाव समोर आल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या प्रकरणात आता महसूल विभागात खळबळ उडालीय. मात्र, संबंधित तहसीलदारांविरुद्ध अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई जाहीर झालेली नाही. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही अधिकारी किंवा व्यक्तींचा सहभाग होता का, याचाही तपास आता सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात आणि तपासाची दिशा कोणत्या टप्प्यावर पोहोचते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






