Thursday, September 10, 2026

Mumbai Municipal Corporation : महापालिका स्थायी समितीत यापुढे शिवसेना गटनेत्याचा न बसण्याचा निर्धार

Mumbai Municipal Corporation : महापालिका स्थायी समितीत यापुढे शिवसेना गटनेत्याचा न बसण्याचा निर्धार

कॉलनी ऑफीसरवरच नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप

एसआरए अभय योजनेत कॉलनी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी चक्क प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत गरीब झोपडीधारकांची फाईल मंजूर करण्यासाठभी पाच ते दहा लाखांची बोली लावून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. अशाप्रकारचा भ्रष्टाचार उघड्या डोळ्यांनी सत्तेत राहून पाहण्याऐवजी असली सत्ता नसली तरी चालेल अशा शब्दांत त्यांनी ही नाराजी व्यक्त करत जोवर अशाप्रकारचे कॉलनी ऑफीसरवर कारवाई होत नाही तोवर आपण पुढील एकाही स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार नाही असे सांगत या समितीतून सभात्याग केला. (Mumbai Municipal Corporation)

स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे शिवसेना पक्षाचे महापालिका गटनेते अमेय घोले यांनी एफ उत्तर विभागातील कॉलनी ऑफीसरच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात मागील महिन्यात हरकतीच्या मुद्दयाद्वारे आवाज उठवल्यानंतर त्याबाबत प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही. पण आता मी त्यांची नावे देत आहे. एफ उत्तर विभागातील तीन कॉलनी अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत हे गरीब झोपडीधारकांकडून ५ ते १० लाख रुपयांची मागणी करत त्यांची लूट करत आहे.शासनाने एसआरए प्रकल्पातील कुटुंबांकरता अभय योजना जाहीर केली आहे. यामध्ये महापालिकेच्या मालमत्तांमधील योजनांमधील परिशिष्ट दोनसंदर्भातील नोंदी या महापालिकेकडे असल्यामुळे त्या नोंदीची दखल घेवून फाईल बनवून देण्यासाठी ही पैशांची मागणी होत आहे. त्यामुळे एकप्रकारे गरीब कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागत असून जी कुटुंबे त्यांची मागणी पूर्ण करत नाही त्यांची फाईल बनवली जात नाही. त्यामुळे माझ्या विभागात ३५० कुटुंबांची कामे अडकली गेली आहेत. पण कॉलनी अधिकारी विरोधात कारवाई होत नाही. काहींची तीन महिन्यांपूर्वी बदली होवून ते तिथेच आहे. त्यामुळे या स्थायी समितीत बसून जर आम्हाला याची उत्तरे मिळणार नसतील तर असल्या स्थायी समितीत मी आजपासून बसणार नाही, मी या स्थायी समितीच्या सभेवर बहिष्कार घालतो. हा प्रकार एका एफ उत्तर विभागापुरता सिमित नसून संपूर्ण संपूर्ण मुंबईत असेच प्रकार सुरु आहेत. त्यामुळे असला भ्रष्टाचार आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही,असे सांगत त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. (Mumbai Municipal Corporation)

त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी त्यांना विनंती करून बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही ते निघून गेले. त्यानंतर शिंदे यांनी ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. अशा अधिकाऱ्यांकडे का कानाडोळा केला जाता असा सवाल कतर अभय योजनेला लाभ मिळण्यासाठी जर कुटुंबे प्रयत्न करत असतील आणि अधिकार आपले लाच मागत असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई व्हायलाच हवी. जर त्या अधिकाऱ्यांची बदली होवून ते जर तिथेच असतील तर तो महापालिका आयुक्तांच्याही आदेशाचे पालन होत नाही. त्यामुळे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांची बदली करण्यात यावी तसेच पुढील स्थायी समितीच्या सभेपूर्वी याचा अहवाल सादर केला जावा अशी निर्देशही शिंदे यांनी दिले. (Mumbai Municipal Corporation)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >