Duleep Trophy Final : १३ वर्षांनंतर ईस्ट झोनकडे दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद; इशान किशनच्या ऐतिहासिक द्विशतकासह दमदार कामगिरी



चेन्नई : दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात इशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोन संघाने शानदार कामगिरी करत १३ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. अंतिम सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या आधारावर ईस्ट झोनने तिसऱ्यांदा दुलीप ट्रॉफीवर आपले नाव कोरले.(Duleep Trophy Final)



इशान किशन आणि फलंदाजांचे वर्चस्व


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ईस्ट झोनने आपल्या पहिल्या डावात अफाट फलंदाजी करत ७०८ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन (७२) आणि वैभव सूर्यवंशी (४४) यांनी शतकी भागीदारी करत दमदार सुरुवात करून दिली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शिखर मोहनने ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.(Duleep Trophy Final)


कर्णधार इशान किशनने अप्रतिम फलंदाजी करत ३३४ चेंडूंमध्ये ३० चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने तब्बल २७० धावांची महाविस्फोटक खेळी केली, मात्र त्याचे त्रिशतक अवघ्या ३० धावांनी हुकले. तसेच कुमार कुशाग्रने १०१ धावांची शतकी खेळी केली. कुशाग्र आणि इशानने पाचव्या विकेटसाठी २३० धावांची जुगलबंदी केली. याशिवाय अनुकूल रॉयने ४५ आणि मोहम्मद कौनाईन कुरेशीने ४० धावांचे योगदान दिले. साऊथ झोनकडून त्रिपुरन विजयने ४ बळी घेतले.(Duleep Trophy Final)



साऊथ झोनचा पहिला डाव व तिलक वर्माचे शतक हुकले


प्रत्युत्तरात, साऊथ झोनची पहिली सुरुवात अतिशय खराब झाली आणि रिकी भुई केवळ १ धाव काढून बाद झाला. नारायण जगदीसनने ३२, तर देवदत्त पडिक्कलने ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. शेख रशीदने २७ धावा केल्या. कर्णधार तिलक वर्माने झुंज दिली, मात्र त्याचे शतक अवघ्या १ धावेने हुकले आणि तो ९९ धावांवर बाद झाला. पहिल्या डावात साऊथ झोनचा संपूर्ण संघ ३३६ धावांवर आटोपला.



दुसरा डाव आणि सामना अनिर्णित


सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी ईस्ट झोनने आपला दुसरा डाव ७ बाद ३८८ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात वैभव (८) आणि अभिमन्यू (३) लवकर बाद झाले, मात्र इशान किशनने ८० आणि शिखर मोहनने ५२ धावांची खेळी केली. तसेच कुमार कुशाग्रने ४६, अनुकुल रॉयने ६४ आणि मोहम्मद कौनाईन कुरेशीने नाबाद ११६ धावांची शतकी खेळी केली. सामना अनिर्णित राहिला असला तरी पहिल्या डावातील मजबूत आघाडीच्या बळावर ईस्ट झोनला विजेता घोषित करण्यात आले.(Duleep Trophy Final)



वैयक्तिक पुरस्कार


संपूर्ण स्पर्धेत दोन्ही डावांत मिळून एकूण ३५० धावा करणाऱ्या कर्णधार इशान किशन याला 'सामनावीर' म्हणून गौरविण्यात आले, तर साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा याला 'स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू' (Player of the Series) म्हणून सन्मानित करण्यात आले. ईस्ट झोन संघाने यापूर्वी २०११-१२ आणि २०१२-१३ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.




Comments
Add Comment

Harshit Rana : हर्षित राणाच्या दुखापतीने टीम इंडियाला धक्का; अफगाणिस्तान मालिका अन् एशियन गेम्स हुकले

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय

Junior Women's Asia Cup 2026 : भारताचा पाकिस्तानवर १९-० असा ऐतिहासिक आणि दणदणीत विजय, उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश

मोकी (चीन) :  महिला ज्युनियर आशिया कप २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत भा

Friendly match against India : ब्राझीलच्या २६ सदस्यीय स्टार फुटबॉल संघाची घोषणा, कार्लो अँसेलोटी यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद

नवी दिल्ली : पाच वेळा विश्वचषक विजेता असलेला ब्राझीलचा फुटबॉल संघ ३ ऑ

Asian Games 2026 : भारतीय संघात मोठा बदल, दुखापतग्रस्त जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी प्रतिका रावलला संधी

नवी दिल्ली : येत्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारतीय महिला क्रि

Ramabai Ranveer : रामाबाईंच्या जिद्दीची सचिन तेंडुलकरने घेतली दखल; मुलींसह चौघांना दिली खास भेट

बीड : मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉनमध्ये धावून ३ हजार रुपयांचे बक्षीस जिंकणाऱ्या बीड जिल्ह्यातील

Junior Hockey Asia Cup 2026 : चायनीज तैपेईचा १५-० ने धुव्वा उडवत भारत उपांत्य फेरीत; कर्णधार अनमोल एक्काचे विक्रमी ६ गोल

मोकी (चीन) : गतविजेत्या भारतीय संघाने एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ मध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखत धमाकेदार