Thursday, September 10, 2026

Nanded Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! ट्रक-टाटा मॅजिकची जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

Nanded Road Accident : नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! ट्रक-टाटा मॅजिकची जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड-भोकर मार्गावर ट्रक आणि टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. (Nanded Road Accident)

अहवालानुसार, नांदेड - भोकर मार्गावर ट्रक आणि टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनचा संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. नांदेड ते भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ सीताखंडी इथं हा अपघात घडला. (Nanded Road Accident)

भोकरकडून नांदेडच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या टाटा मॅजिक प्रवासी व्हॅनला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, टाटा मॅजिक व्हॅनचा चक्काचूर झाला आणि व्हॅन रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. अपघाताच्या वेळी दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता. ही एक प्रवासी व्हॅन होती, त्यामुळे व्हॅनमध्ये एकूण १५ जण प्रवास करते होते.

ट्रकची जोराची धडक बसल्यामुळे व्हॅनमधील ५ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला असून रस्त्यावर अक्षरश: मृतदेहांचा खच पडला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती तातडीने पोलीस आणि रुग्णवाहिकेला देण्यात आली. जखमी नागरिकांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवलण्यात आले आहे. एकूण ८ जण जखमी झाले आहे. पण, काही प्रवाशांची प्रकृती ही चिंताजनक आहे, त्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Nanded Road Accident)

धक्कादायक म्हणजे, व्हॅनला धडक दिल्यामुळे ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, त्यामुळे अपघातानंतर ट्रकचालक ट्रकमध्ये अडकून पडला होता. ट्रक चालकाला बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरू आहेत. जखमींना भोकर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहे. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप समोर येऊ शकलं नाही. व्हॅनमध्ये प्रवास करणारे हे स्थानिक रहिवाशीच आहे. अपघाताची बातमी कळताच मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. (Nanded Road Accident)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >