Navi Mumbai Airport: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक स्वस्त; नेमकं कारण काय?

नवी मुंबई: विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार आहे. भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुधारित व्हेरिएबल टॅरिफ प्लॅनला (Variable Tariff Plan- VTP) मंजुरी दिली आहे. त्यामुळे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला मोठी गती मिळणार आहे.



नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने मागणी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार, सवलतीसाठीची पात्रता मुंबई महानगर प्रदेशातील नवीन मार्ग ऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवीन मार्ग अशी करण्यात आली आहे. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ज्या विमान कंपन्या नव्याने आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना लँडिंग शुल्कात (Landing Charges) भरीव सवलतींचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्ग असल्यामुळे पहिल्या वर्षी लँडिंग शुल्कात १००% पूर्ण सवलत मिळणार आहे. ५००० किमी पेक्षा कमी अंतर असणार्‍या मार्गांवर दुसऱ्या वर्षी ५०% सवलत मिळणार आहे. ५००० किमी पेक्षा जास्त अंतर अर्थात लांब पल्ल्यांच्या विमान प्रवास असणाऱ्या मार्गांवर दुसऱ्या वर्षी ५०% आणि तिसऱ्या वर्षी २५% सवलत मिळणार आहे. अतिरिक्त आंतरराष्ट्रीय फेऱ्या ज्या अस्तित्वात असलेल्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्यास ७५% पर्यंत सवलत मिळेल. आंतरराष्ट्रीय मालवाहू सेवाला पहिल्या वर्षी ९०% आणि दुसऱ्या वर्षी ५०% सवलत दिली जाणार आहे.



विमान कंपन्यांसाठी हे सुधारित निकष नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहू उड्डाणे सुरू करू इच्छिणाऱ्या विमान कंपन्यांसाठी अधिक आकर्षक बनवत आहेत. यामुळे नवीन हवाई मार्गांचा जलद विकास होण्याची शक्यता आहे. शिवाय, नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होईल. अधिक विमान कंपन्यांचा सहभाग आणि थेट आंतरराष्ट्रीय मार्गांमुळे प्रवाशांना अधिक पर्यायी गंतव्यस्थाने, सुधारित कनेक्टिव्हिटी आणि स्वस्त तिकीट दरात तिकिटे उपलब्ध होणार आहेत. मालवाहू विमानांसाठी दिलेल्या सवलतींमुळे या भागातील एअर कार्गो कनेक्टिव्हिटीच्या वाढीला मोठा पाठिंबा मिळेल. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) आणि सिडको (CIDCO) यांच्यातील सार्वजनिक- खाजगी भागीदारीतून (PPP) विकसित करण्यात आलेले

">नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
(NMIA) हे सुरुवातीच्या वार्षिक २ कोटी (२० दशलक्ष) प्रवासी क्षमतेवरून पूर्ण विकासानंतर ९ कोटी (९० दशलक्ष) प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन कार्गो हाताळणी क्षमतेपर्यंत वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane : कोकणातील जलमार्गांना दिशा देण्यासाठी मंत्री नितेश राणेंकडून अभ्यास दौरा

गोव्यात जलवाहतुकीचा प्रत्यक्ष अनुभव; सिंधुदुर्गात जहाजबांधणी, दुरुस्ती उद्योगाच्या संधींचा अभ्यास मुंबई :

Draft Voter List : प्रारूप मतदार यादी आणि २०२४ च्या विधानसभा मतांची तुलना करणे चुकीचे; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा स्पष्ट खुलासा

Mumbai :

FDA action : अन्न व औषध प्रशासनाचा दणका! शिळ-दिवा परिसरातील २० लाखांचा अस्वच्छ अन्नसाठा जप्त; मुंबई-पुण्यातील नामवंत हॉटेल्सचे परवाने निलंबित

Mumbai : सणासुदीचा काळ जवळ येत असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध तीव्र मोहीम

MMRDA transfer : एमएमआरडीएच्या सामाजिक विकास शाखेत मोठा फेरबदल; १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलला पुन्हा ब्रेक! सुरक्षा जाळ्यांमुळे सेवा सुरू होण्यास आणखी विलंब?

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असलेली मोनोरेल पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची

Saifee Hospital Defamation Case : सैफी रुग्णालयाचा महिला डॉक्टरविरोधात १२५ कोटींचा मानहानीचा दावा; छळाच्या आरोपांवरून वाद आता न्यायालयात!

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध सैफी रुग्णालयाने (Saifee Hospital) आपल्या एका प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थी (ट्रेनी)