Saifee Hospital Defamation Case : सैफी रुग्णालयाचा महिला डॉक्टरविरोधात १२५ कोटींचा मानहानीचा दावा; छळाच्या आरोपांवरून वाद आता न्यायालयात!

मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध सैफी रुग्णालयाने (Saifee Hospital) आपल्या एका प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) महिला डॉक्टरविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १२५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर करून रुग्णालयाची आणि तिथल्या डॉक्टरांची नाहक बदनामी केल्याचा ठपका रुग्णालय प्रशासनाने या महिला डॉक्टरवर ठेवला आहे.



प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचे गंभीर आरोप


अशिया खान लुकमान असे या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे नाव आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आरोप केला होता की, सैफी रुग्णालय आणि तिथले वरिष्ठ डॉक्टर्स प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना नियमापेक्षा जास्त वेळ काम करायला लावतात. तसेच तिथे ट्रेनी डॉक्टरांचे रॅगिंग केले जाते आणि त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.



रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले


रुग्णालय ट्रस्टने हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. आपल्या कामातील चुका आणि गैरवर्तनावरून लक्ष हटवण्यासाठी या महिला डॉक्टरने हे बनावट आरोप केले आहेत, असा दावा रुग्णालयाने केला आहे. "स्वतःच्या चुकीच्या वर्तनाचे परिणाम लपवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी मानसिक त्रासाचा बहाणा केला जात आहे," असे रुग्णालयाने याचिकेत म्हटले आहे. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने संबंधित महिला डॉक्टरला रुग्णालयाबाबत कोणतीही नवी पोस्ट न करण्याचे कडक आदेश दिले आहेत.



कामातील निष्काळजीपणा आणि उपस्थितीवरून वाद


अशिया खान यांनी फेब्रुवारी महिन्यात 'नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स' (DNB) च्या जनरल सर्जरीच्या प्रशिक्षणार्थी म्हणून सैफी रुग्णालयात काम सुरू केले होते. मात्र, रुजू झाल्यापासूनच त्यांच्या उपस्थितीवरून आणि कामातील निष्काळजीपणावरून तक्रारी सुरू झाल्या. मार्च ते मे दरम्यान त्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहिल्या, ज्यामुळे रुग्णालयाच्या रोजच्या कामकाजावर परिणाम झाला, असा आरोप रुग्णालयाने केला आहे.



वारंवार नोटिसा आणि तक्रार


रुग्णालय प्रशासनाने अशिया यांना कामात सुधारणा करण्यासाठी अनेकदा नोटिसा दिल्या आणि त्यांच्या वर्तनाची तक्रार वैद्यकीय शिक्षण मंडळाकडे (NBEMS) केली. ३ जून रोजी पाठवलेल्या पत्रात रुग्णालयाने नमूद केले होते की, २० मे पासून या डॉक्टरने एकाही रुग्णाची तपासणी केलेली नाही. त्या कामाच्या वेळी अनुपस्थित असतात आणि नोटिसांना उत्तरही देत नाहीत. ४ जून रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी स्वतःच्या चुका मान्य केल्या होत्या, असा दावाही रुग्णालयाने केला आहे.



रविवारची सुट्टी नाकारल्याने वाद वाढला


१ जुलै रोजी अशिया यांनी रुग्णालयाकडे दर रविवारी सुट्टी देण्याची मागणी केली होती. मात्र, रुग्णालय हे २४ तास आपत्कालीन सेवा देणारे ठिकाण असल्याने सर्व प्रशिक्षणार्थींना पाळ्यांनुसार (Shifts) काम करावे लागते, त्यामुळे त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली. ही मागणी फेटाळल्यानंतर लगेचच अशिया यांनी सोशल मीडियावर वरिष्ठ डॉक्टर्स आणि रुग्णालयाविरोधात छळाचे आरोप करणारी पोस्ट शेअर केली.



महिला डॉक्टरच्या वकिलांचा बचाव


महिला डॉक्टरच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, "कामाच्या ठिकाणी होणारा अन्याय, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करून घेणे याविरोधात आवाज उठवणे आणि शिक्षण मंडळाकडे दाद मागणे म्हणजे मानहानी होत नाही." संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. या डॉक्टरला कोणाची बदनामी करायची नसून, केवळ सन्मानाने तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.



महिला डॉक्टर निलंबित; मुख्यमंत्र्यांकडे धाव


या वादानंतर रुग्णालय प्रशासनाने अशिया खान यांना निलंबित केले असून रुग्णालयाच्या परिसरात येण्यास बंदी घातली आहे. निलंबनानंतर अशिया यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कमिशन आणि शिक्षण मंडळाला टॅग करत पोस्ट केली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यामुळेच रुग्णालयाने आपल्याला चुकीच्या पद्धतीने बाहेर काढले, असा आरोप त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment

MMRDA transfer : एमएमआरडीएच्या सामाजिक विकास शाखेत मोठा फेरबदल; १६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

Mumbai : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेलला पुन्हा ब्रेक! सुरक्षा जाळ्यांमुळे सेवा सुरू होण्यास आणखी विलंब?

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची वाहतूक सेवा असलेली मोनोरेल पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची

Disha Saliyan Case : दिशा सालियनप्रकरणी CBI कडून तपास अधिकाऱ्याची नियुक्ती, DSP पुरण कुमार यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती

दिशा सालियनच्या (Disha Saliyan) कथित आत्महत्या प्रकरणाला आता एक नवे आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च

Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचा निर्धार

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'च्या

Vishwas Patil News: "दहिहंडीतील लावणी म्हणजे सूज..." , कादंबरीकार विश्वास पाटील यांची टीका

मुंबई: मुंबईमध्ये 'प्रकाशचित्रांतून लोक कलावंतांचे स्मृतीवंदन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अखिल

Mumbai Municipal Corporation : महापालिका स्थायी समितीत यापुढे शिवसेना गटनेत्याचा न बसण्याचा निर्धार

कॉलनी ऑफीसरवरच नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप एसआरए अभय योजनेत कॉलनी अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप मुंबई