मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत राहावी आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर विविध टप्प्यांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणेशोत्सवपूर्व तयारी आणि गणेशमूर्तींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून या निर्बंधांना सुरुवात होणार आहे. (Mumbai Goa Highway)
११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या ट्रक, मल्टीॲक्सल वाहने, ट्रेलर, लॉरी आदी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्ण बंदी राहणार आहे. वाहनाची वजनक्षमता ठरविताना मालासह वाहनाचे एकूण वजन म्हणजेच ‘टोटल ग्रॉस व्हेईकल वेट’ ग्राह्य धरले जाणार आहे.
गणेशमूर्तींच्या आगमनानंतर विसर्जनासाठी कोकणाकडे आणि तेथून मुंबईकडे परतणाऱ्या गणेशभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील टप्प्यांतही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाच दिवसांच्या गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांना बंदी राहील. सात दिवसांच्या गणपती तसेच गौरी-गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत निर्बंध लागू राहतील. (Mumbai Goa Highway)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश; महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे पाहणी करणार मुंबई : पावसाने दडी मारल्याने उभी पिके करपलेल्या ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या १२ दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. गणेशभक्तांची सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक तसेच महामार्गावरील परिस्थिती लक्षात घेऊन या निर्बंधांच्या अंमलबजावणीत स्थानिक पातळीवर आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीला या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने या निर्बंधांना अपवाद असतील. त्याचप्रमाणे दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला तसेच अन्य नाशवंत आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही बंदी लागू राहणार नाही. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन आणि अन्य अत्यावश्यक सेवा देणारी वाहनेही निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. (Mumbai Goa Highway)
Nashik : विकासाची गती कायम ठेवतानाच पर्यावरणाचे संवर्धन करून भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ व शाश्वत नाशिक घडविणे, हाच ‘इको संकल्पा’चा केंद्रबिंदू आहे, असे ...
प्रवेशपत्र बंधनकारक
- मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६च्या रुंदीकरण आणि दुरुस्तीच्या कामासाठी वापरली जाणारी तसेच या कामाशी संबंधित साहित्य आणि मालाची वाहतूक करणारी वाहनेही निर्बंधांच्या कक्षेत येणार नाहीत. मात्र, अशा वाहनांना संबंधित वाहतूक विभाग किंवा महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र घेणे आवश्यक राहणार आहे.
- कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची सुरक्षित वाहतूक आणि महामार्गावरील परिस्थितीचा विचार करून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक परिस्थितीनुसार जड-अवजड वाहनांवरील निर्बंध शिथील करण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील. तसेच जेएनपीटी आणि जयगड बंदरांवरील आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक वाहतूक नियोजन करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिले आहेत. (Mumbai Goa Highway)