हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आई-वडील चक्क भिकारी बनले अन् पुढे ....

गुजरात : मुलांसाठी आई-वडील कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय देणारी एक भावूक आणि फिल्मी वाटावी अशी घटना गुजरातमधून समोर आली आहे. दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी आई-वडिलांनी चक्क भिकाऱ्यांचा वेष धारण केला. मुलांच्या शोधात हे दाम्पत्य गुजरातपासून महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आणि मध्य प्रदेशापर्यंत भटकत राहिलं. अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि दोन्ही मुलं सापडली.



खेळायला गेले अन् पुन्हा घरी परतलेच नाहीत


मूळचे बिहारचे असलेले हे कुटुंब कामाच्या शोधात गुजरातमधील कच्छच्या मुंद्रा येथे वास्तव्यास होते. दाम्पत्याला राहुल (१४) आणि अर्पित (११) अशी दोन मुलं आहेत. एके दिवशी दोन्ही भाऊ खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. आई-वडिलांनी नातेवाईक, मित्र आणि परिसरात सर्वत्र मुलांचा शोध घेतला. मात्र, कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, अनेक दिवस उलटूनही दोन्ही मुलांचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान, मुलांचं अपहरण करून त्यांना भिकारी बनवणाऱ्या टोळीच्या ताब्यात दिलं असावं, असा संशय आई-वडिलांना आला. त्यानंतर त्यांनी स्वतःच मुलांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.



नोकरी सोडली अन भिकाऱ्यांचा वेष घेतला


मुलांना शोधण्यासाठी या दाम्पत्याने आपलं कामधंदाही बाजूला ठेवला. भिकाऱ्यांचा वेष धारण करून ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरू लागले. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात त्यांनी रात्रंदिवस मुलांचा शोध घेतला. कुठे मुलगा दिसतोय का, यासाठी ते भिकाऱ्यांच्या गर्दीतही मुलांचे चेहरे शोधत राहिले. शोध घेत असताना राहुल बिहारमधील भागलपूरमध्ये भिक मागताना असल्याची माहिती त्यांना मिळाली. आई-वडील तातडीने भागलपूरला पोहोचले. भिक मागत असताना राहुल त्यांना दिसला. मात्र, आई-वडिलांना पाहताच त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे मुलगा पुन्हा हातातून निसटल्याने दाम्पत्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं.



अखेर बिकारनेरमध्ये राहुल सापडला


मात्र, आई-वडिलांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा शोधमोहीम सुरू ठेवली. अखेर राहुल बिकारनेरमध्ये सापडला. राहुल सापडल्यानंतरही दाम्पत्याचा शोध थांबला नाही. आता त्यांना आपल्या दुसऱ्या मुलाचा, अर्पितचा शोध घ्यायचा होता. राहुल सापडल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी अर्पितचा पश्चिम बंगालमध्ये शोध लागला. दोन मुलांसाठी आई-वडिलांनी केलेल्या या संघर्षाचा शेवटी सुखद शेवट झाला. मुलं पुन्हा मिळाल्याने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलांच्या शोधासाठी आई-वडिलांनी भिकाऱ्यांचा वेष धारण करून पाच राज्यांत केलेली भटकंती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment

Pushmeet Kohli : NIT वारंगलच्या माजी विद्यार्थ्याची कमाल! Google सोबत उलगडणार मानवी DNA चे गूढ!

नवी दिल्ली : गूगल डीपमाइंडने (Google DeepMind) नुकताच यूट्यूबवर आपले संस्थापक डेमिस हसाबिस यांच्यावर आधारित एक

OpenAI ची मोठी घोषणा! 'ChatGPT Images 2.5' लाँच; सेकंदांत तयार होणार HD फोटो!

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'ओपनएआय'ने (OpenAI) आपले नवीन आणि प्रगत इमेज

Hardik Pandya : ऑस्ट्रेलिया 'अ' मालिकेसाठी भारत 'अ' संघाची घोषणा : हार्दिक पांड्याची एकदिवसीय संघात निवड

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पुरुष निवड समितीने ऑस्ट्रेलिया 'अ' (Australia A) विरुद्ध

Google DeepMind AlphaGenome Atlas : प्रथिनांच्या रचनेनंतर आता मानवी जनुकाचे रहस्य उलगडणार; गुगल डीपमाइंडचे 'अल्फाजीनोम ॲटलास' लाँच

नवी दिल्ली : सुमारे आठ वर्षांपूर्वी गुगलच्या 'डीपमाइंड' (Deepmind) या संशोधन संस्थेने जीवशास्त्राच्या गूढ जगाचा अभ्यास

Gaurav Bhatia : CJP ला मोठा झटका! AI जनरेटेड फेक फोटो भोवला; भाजपच्या गौरव भाटियांचा २ कोटींचा मानहानीचा खटला!

नवी दिल्ली : युवा आणि 'Gen Z' राजकारणाचा दावा करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Chockroach Janta Party) अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

BRICS 2026 : भारत आणि चीन संबंध : तणाव कमी होतोय, पण...ब्रिक्स परिषदेत मोदी-शी जिनपिंग भेटीकडे जगाचे लक्ष!

नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) या आशियातील दोन मोठ्या देशांमधील बिघडलेले संबंध हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे