Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगमन व विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्या ५० फुटांपर्यंत छाटा!

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले निर्देश, नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी केली मागणी


मुंंबई ( विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असताना, गणेशमूर्तींच्या आगमन व विसर्जन मार्गावर झाडांच्या फांद्यांची योग्य प्रकारे छाटणी झाली नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर असून गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील सर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी ५० उंची पर्यंत त्वरीत करण्यात यावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले


भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी स्थायी समिती आजच्या सभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत, आगमन आणि विसर्जन मार्गावरील दोन्ही बाजूंच्या झाडांच्या फांद्या किमान ५० फूट उंचीपर्यंत त्वरित छाटण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी आग्रही मागणी केली.



परळसह मुंबईतील विविध कार्यशाळांमधून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी उंच मूर्ती मंडपात नेण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, मार्गातील झाडांच्या अस्ताव्यस्त फांद्या आणि लटकणाऱ्या केबल्समुळे या आगमनात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, उंच गणेशमूर्ती नेताना मंडळांचे स्वयंसेवक मूर्तीच्या मागे उभे राहून किंवा इमारतींमधील नागरिक गॅलरीतून काठ्यांच्या साहाय्याने फांद्या व केबल्स वर उचलून मार्ग मोकळा करत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे, याकडे तिवाना यांनी समितीचे लक्ष वेधले.


"मुंबई महानगरपालिका दरवर्षी आगमन व विसर्जनाची व्यवस्था चोख बजावते. परंतु, यंदा झाडांच्या फांद्या योग्य रीतीने न छाटल्यामुळे स्वयंसेवकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. श्री गणरायाचे आगमन आणि विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे," असे तेजिंदर सिंग तिवाना यांनी नमूद केले. या समस्येचे गांभीर्य ओळखून स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला तातडीने निर्देश द्यावेत आणि आगमन-विसर्जन मार्गावरील झाडांची ५० फुटांपेक्षा जास्त उंचीपर्यंत योग्य छाटणी करून मार्ग अडथळामुक्त करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.

Comments
Add Comment

BMC News : मुंबई महापालिकेत दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपचा सभात्याग

सुधार समितीत निर्माण झाला वाद, जोगेश्वरीतील प्रकल्प बाधितांच्या घरांची उभारणी करण्याचे आरक्षण रद्द वगळण्या

Goregaon Patra Chawl : गोरेगाव पत्राचाळीत परिसरातील आरक्षण बदलाचा प्रस्ताव फेटाळला

सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव फेरविचारसाठी पाठवला मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगावमधील वादग्रस्त

BMC Water Department : मुंबईतील पाणी साठे सॅटेलाईटद्वारे शोधा

गळती, अनधिकृत जोडणी, पाणी चोरी,नवीन बांधकामांचे पाणी रोखा; स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई (विशेष

BMC Marathi Exam : महापालिकेत मराठीची परीक्षा पास व्हावीच लागेल

स्थायी समितीने प्रशासनाचा प्रस्ताव परत पाठवला मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के

BMC : बांधकाम व पाडकामादरम्यान निर्माण होणाऱ्या राडारोडाची महानगरपालिका संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक

दिनांक २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदणीसाठी मुदत मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईत निर्माण होणाऱ्या बांधकाम आणि

Maharashtra Monsoon : राज्यात पाऊस पुन्हा बरसणार; विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. सप्टेंबर महिन्यातही अनेक भागांत अपेक्षित