बाप्पाच्या दर्शनासाठी Pune Metro सज्ज, गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; वाचा एका क्लिकवर वेळापत्रक

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये, पुणेकरांना महामेट्रोकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई- पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. या काळामध्ये महा मेट्रोकडून अतिरिक्त वेळेमध्ये मेट्रो चालवली जाणार आहे. त्यामुळे जर तुमचा पुण्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार असेल, तर तुम्ही नक्की जाऊ शकता. 'पुणे मेट्रो'ने त्यांच्या सोशल मिडिया हँडलवरून गणेशभक्तांना ही महत्त्वाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेशभक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता, पुणे मेट्रोने विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे.



१४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या तीन दिवसांसाठी सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत या नियमित वेळेमध्ये मेट्रो चालवली जाणार आहे. तर, १७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत मेट्रो चालवली जाणार आहे. तर, शुक्रवारी २५ सप्टेंबर २०२६ रोजी म्हणजेच, अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ६ ते शनिवारी २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा सुरू राहील. एकूण ४१ तासांसाठी महा मेट्रोकडून गणेशभक्तांना ही खास सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर २७ सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा पुन्हा नियमित वेळेनुसार सुरू होईल.

 



शिवाय, गणेशोत्सवाच्या काळात मेट्रो स्थानकांवर आणि मेट्रोमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईल, पाकिट, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवण्याची माहिती, मेट्रो प्रशासनाने आणि पोलिस प्रशासनाने नागरिकांना दिली आहे. गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारांकडून चोरी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी विशेष खबरदारी घ्यावी. मेट्रो प्रशासनानेही गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर दिला आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेशभक्तांकडून मेट्रोला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. पीक अवर्समध्ये दर पाच मिनिटांनी मेट्रो उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची महामेट्रोकडून तपासणी केली जात आहे, चाचणी यशस्वी होताच ती आंमलात आणली जाणार आहे.
Comments
Add Comment

MPSC Student Suicide : MPSCची तयारी, कर्जाचा ताण अन् नैराश्य; पुण्यात 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या

पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Pune Crime : लग्नाला काही महिनेच झाले... पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा आरोप अन् २५ वर्षीय नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime : ज्या वयात नव्या संसाराची स्वप्नं रंगवायची, त्याच वयात एका नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक

Dadaji Bhuse : राज्यातील सर्व शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करणार; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

नागूपर : नागपूर येथील लालबहादूर शास्त्री हिंदी शाळेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळांचा विकास करून त्या ‘मॉडेल

Pune MPSC Student Suicide: पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधलं कारण वाचून सर्वच हादरले...

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्याची

Justice Mahesh Chandra Tripathi : न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभात अलाहाबाद उच्च

गणेशोत्सवात होणार भक्तांची मोफत आरोग्य तपासणी? कुठे मिळणार फायदा

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारकडून भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत 'मुख्यमंत्री सहाय्यता