Social Media : १८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर निर्बंध? सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : १८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत सुरक्षेचे कठोर उपाय करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. Just Rights for Children Alliance या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकारकडून उत्तर मागितले. अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट उघडण्यासंदर्भात अधिक प्रभावी नियम आणि सुरक्षाव्यवस्था निर्माण करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. (Social Media)



याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत पुरेशी स्पष्टता आणि प्रभावी वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. त्यामुळे १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाऊंट तयार करण्यापूर्वी पालकांची संमती आवश्यक करावी, तसेच वयाची पडताळणी करण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अल्पवयीन व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत कायदेशीर करार करू शकते का, हा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. (Social Media)



याचिकेत मुलांच्या डिजिटल सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या अनियंत्रित वापरामुळे ऑनलाइन ग्रूमिंग, सायबरबुलिंग, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, वैयक्तिक माहितीचा गैरवापर आणि वयानुसार अयोग्य कंटेंटच्या संपर्कात येण्यासारखे धोके निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरासाठी पालकांची भूमिका आणि अधिक मजबूत सुरक्षा उपाय निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, सध्या १८ वर्षांखालील मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही बंदी घातलेली नाही. ही याचिकाकर्त्यांची मागणी असून, या प्रकरणात केंद्र सरकारचे उत्तर आल्यानंतर पुढील सुनावणीत त्यावर विचार होणार आहे. (Social Media)

Comments
Add Comment

E commerce rules : ई-कॉमर्स क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे नवे नियम जाहीर; ग्राहक संरक्षण मजबूत होणार, सुधारित नियम..... पासून लागू

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल बाजारपेठेत पारदर्शकता

BRICS Summit 2026 : ब्रिक्स शिखर परिषद २०२६ नवी दिल्लीत सुरू; विविध राष्ट्रीय हितसंबंधांत सहमती घडवून आणण्याचे जगासमोर मोठे आव्हान

नवी दिल्ली : युद्ध, आर्थिक निर्बंध, व्यापारातील वाढते अडथळे आणि पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

दुबई, अमेरिका की भारत... iphone 18 pro ची सीरीज सर्वाधिक महाग कोणत्या देशात?

मुंबई: ॲपलकडून नव्या iphone 18 pro ची सीरीज लाँच करण्यात आली. काल आयफोन लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार

Isro ce20 Cryogenic Engine : इस्रोची ऐतिहासिक भरारी : 'CE20' क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी; 'गगनयान' मोहिमेची ताकद वाढणार!

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशाच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीत आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.

PM Modi XI Jinping Meeting : गलवान संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी अन् चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमनेसामने; ब्रिक्स परिषदेत द्विपक्षीय चर्चेची शक्यता

नवी दिल्ली : नवी दिल्लीत १२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'ब्रिक्स' (BRICS) शिखर परिषदेच्या निमित्ताने भारताचे

Appleचा मोठा धमाका! iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max कितीला मिळणार? किंमत पाहून धक्का बसेल!

मुंबई: iPhone प्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला. काल (09