Mumbai Crime News : परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न दाखवले अन्...; 3 जणांच्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई : परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोकरी शोधणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबईतील पायधोनी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तीन वेगवेगळ्या राज्यांतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime)


 मस्जिद बंदरमधून चालायचा व्यवसाय
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी मस्जिद बंदर पश्चिम परिसरातील ‘अल शिफा ट्रॅव्हल्स’ या कार्यालयातून नागरिकांशी संपर्क साधत होते आणि त्यांना परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे आणि पैसे घेत होते.



 पासपोर्ट आणि पैसे घेतले
आरोपी प्रत्येक नोकरीच्या इच्छुक व्यक्तीकडून मूळ पासपोर्ट, बायोडाटा आणि 15,000 रुपये घेत होते, मात्र पैसे आणि कागदपत्रे घेतल्यानंतर संबंधितांना नोकरी देण्यात आली नाही आणि काही दिवसांनी आरोपींनी आपले कार्यालय बंद करून मोबाईल फोनही बंद केले.


तक्रारीनंतर पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणातील एका पीडिताने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पायधोनी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला.गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींच्या हालचालींचा माग काढला आणि वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.


 3 आरोपी वेगवेगळ्या राज्यांतून अटकेत
तबरेज आलम अन्सारी याला हरियाणातून, मोहम्मद शमीम अन्सारी याला बिहारमधील मधुबनी येथून, तर व्यंकटेश गंगाव्य चकल याला मुंबईतील टेमकर रोड परिसरातील जेजे डॉर्मेटरीमधून पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी 50 भारतीय पासपोर्ट, 6 संगणक आणि लॅपटॉप, 9 मोबाईल हँडसेट, 13 बँक चेकबुक आणि डेबिट कार्ड, तसेच आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्रांसह इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे.


बनावट नियुक्तीपत्रेही सापडली
पोलिसांच्या कारवाईदरम्यान आरोपींकडून 2 बनावट नियुक्तीपत्रेही जप्त करण्यात आली असून, या कागदपत्रांचा वापर करून नागरिकांचा विश्वास संपादन केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


 50 पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक?
आतापर्यंतच्या तपासात किमान 10 नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे; मात्र जप्त करण्यात आलेल्या पासपोर्टची संख्या पाहता या टोळीने 50 पेक्षा जास्त नागरिकांना अशाच प्रकारे गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


या टोळीच्या माध्यमातून अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पायधोनी पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले असून, यामुळे या प्रकरणातील फसवणुकीचा नेमका आकडा आणि टोळीचे आणखी व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

IPL 2027: कोणत्या खेळाडूंना संघ कायम ठेवणार? रिटेन्शनची शेवटचा तारीख जाहीर, गोव्यात होणार ऑक्शन

[caption id="attachment_1069478" align="aligncenter" width="800"] आयपीएल 2027 अर्थात 20व्या पर्वाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.आयपीएल 2027 साठी सर्व संघांनी

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार! WhatsApp वर APK फाइल न उघडताच ज्येष्ठ वकिलाला 3.80 लाखांचा गंडा

Nashik Crime : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे.

Breaking : भांडुप स्थानकात ट्रॅक ओलांडताना एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वेळेत द्या; ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी-चाऱ्याचे नियोजन करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या

महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे बजेट ५ हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य - मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला देशातील अग्रगण्य राज्यांच्या पंक्तीत आणण्यासाठी विभागाचे बजेट 212 कोटी

मुंबईत आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवा; वायुप्रदूषण रोखण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांची महापालिका आयुक्तांना सूचना

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस