PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त गणेश मंडळांनी विशेष महाआरती!

मुंबईतील १२ हजार गणेश मंडळांना गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन !



मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हिंदू संस्कृती आणि सण परंपरेला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या नेतृत्वाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गणेश मंडळांनी एक दिवस गणरायाची विशेष महाआरती आयोजित करावी, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ७६ व्या जन्मदिनानिमित व त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळावे यासाठी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी येत्या गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी गणरायाजवळ विशेष महाआरती आयोजित करावी असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे. या विशेष महाआरतीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करावेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित अभिष्टचिंतन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.



विकसित भारताची पायाभरणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी ७६ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. या निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण असेल. पंतप्रधान श्री. मोदीजी यांच्या नेतृत्वात मागील १२ वर्षात भारतात हिंदू धर्म, हिंदू सण उत्सवांसाठी केंद्र सरकारने अनेक मोठी निर्णय घेतले. अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी झाली. देशातील शेकडो तीर्थक्षेत्रांचा विकास झाला. मोदीजींच्या नेतृत्वावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा नव्याने जागर झाला.
महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात हिंदू संस्कृती आणि उत्सव परंपराविषयी निर्णय घेण्यात आले. सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांच्या पुढाकारातून तसेच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांनी राज्य सरकारने गतवर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. याब‌द्दल समन्वय समितीने राज्य शासनाचे यापूर्वीच जाहीर अभिनंदन केले होते.



सार्वजनिक गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट महाआरतीचे प्रथम पारितोषिक रु.५१,०००/-,
द्वितीय पारितोषिक रु.३१,०००/-,
तृतीय पारितोषिक रु.२१,०००/-
घरगुती गणेशोत्सवासाठी विधान सभा क्षेत्र
प्रथम पारितोषिक रु.५,०००/-,
द्वितीय पारितोषिक रु.३,०००/-
तृतीय पारितोषिक रु.२,०००/-

Comments
Add Comment

BMC News : एकाच पदावर १० ते १२ वर्षांपासून काम करणाऱ्यांच्या त्वरीत बदली करा

महापालिका स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील विविध खाते आणि

BMC News : महापालिकेच्या भूखंडावरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्पांच्या माहितीचा मासिक अहवाल मागवला

सुधार समितीच्या पटलावर अहवाल ठेवण्याचे अध्यक्षांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या

BMC Fire Brigade : अंधेरीतील अग्निशमन दल आणि महापालिका चौकीचे आरक्षण वगळण्याचा प्रयत्न

आरक्षण बदलाचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळून लावला आरक्षण नको असे रिमार्क देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी

Mumbai Cleanliness Workers : मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या कामांची व्याप्ती वाढली

आता खुल्या आणि बंदिस्त नाल्यांसह अंतर्गत गटारांचीही करावी लागणार स्वच्छता शौचालयांच्या देखभाल आणि स्वच्छतेचे

BMC Ganeshotsav : मुंबईतील श्रीगणेशोत्सव पूर्वतयारीची महापौर

रितू तावडे यांनी केली पाहणी, महापौरांनी व्यक्त केले समाधान मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रीगणरायाचे आगमन आणि

Mumbai News : घरीच झालेल्या प्रसूत झालेल्या महिलेची आनंदीबाई जोशी प्रसूतीगृहात यशस्वी प्रसूती

माता आणि बाळ दोघांची प्रकृती ठिक महिला बाल कल्याण समिती अध्यक्षा आणि आरोग्य समिती अध्यक्षांनी भेट घेत मातेच्या